ETV Bharat / international

बेलारुसच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने; शेकडोंच्या संख्येत महिला रस्त्यावर - बेलारुस अध्यक्ष विरोधी आंदोलन

बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अ‌ॅलेक्झँडर लुकाशेन्को यांच्याविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. शनिवारीही लुकाशेन्को यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो महिला रस्त्यांवर आल्या होत्या. राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असूनही हे आंदोलन सुरुच होते...

Belarus: Protesters keep up push for president's resignation
बेलारुसच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने; शेकडोंच्या संख्येत महिला रस्त्यावर
author img

By

Published : Oct 25, 2020, 8:07 AM IST

मिन्स्क : बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अ‌ॅलेक्झँडर लुकाशेन्को यांच्याविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. शनिवारीही लुकाशेन्को यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो महिला रस्त्यावर आल्या होत्या. राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असूनही हे आंदोलन सुरुच होते.

ऑगस्टपासून सुरू आहेत आंदोलने..

ऑगस्ट महिन्यात बेलारुसच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याच्या आधीपासूनच देशात अध्यक्षांविरोधात आंदोलने सुरू होती. त्यातच, लुकाशेन्को यांची सहाव्यांदा प्रचंड बहुमताने अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ही आंदोलने अधिकच पेटली.

मतदानाच्या आकडेवारीत फेरफार केल्याचा आरोप..

देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, लुकाशेन्को यांना ८०.२३ टक्के मते मिळाली होती. तर त्यांचे मुख्य विरोधक स्वैतलाना त्सिखानौस्काया यांना केवळ ९.९ टक्के मते मिळाली. यामुळे विरोधकांनी मतदानाच्या आकडेवारीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

प्रचंड विरोधानंतरही कित्येक महिने सुरु आहेत आंदोलने..

पोलिसांनी आतापर्यंत कित्येक आंदोलकांना अटक केली आहे. शनिवारीच दहा आंदोलकांना अटक करण्यात आली होती. मात्र, तरीही बेलारुसचे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. आठवड्याच्या शेवटी शनिवार-रविवारी तर लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत.

लुकाशेन्कोचा चर्चेस नकार..

अमेरिका आणि युरोपीय युनियन यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुका या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी प्रमुख विरोधी नेत्या स्वैतलाना त्सिखानौस्काया यांच्यासोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्याची मागणी अमेरिका आणि युरोपीय युनियन यांनी केली आहे. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

हेही वाचा : दुसरी टाळेबंदी रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्या; इटलीच्या पंतप्रधानांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.