ETV Bharat / international

अफगाणिस्तानात गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक ठार, 375 जखमी

अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या युद्धग्रस्त देशात मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक ठार आणि 375 जण जखमी झाल्याचे जाहीर केले आहे.

अफगाणिस्तान हिंसाचार न्यूज
अफगाणिस्तान हिंसाचार न्यूज
author img

By

Published : Oct 22, 2020, 6:56 PM IST

काबूल - अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या युद्धग्रस्त देशात मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक ठार आणि 375 जण जखमी झाल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा - अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी

टोलो न्यूजनुसार, मंत्रालयाने मंगळवारी याचा खुलासा केला. अफगाण सरकार आणि तालिबानचे प्रतिनिधीत्व करणारे वाटाघाटी करणारे देशातील अनेकजण अनेक दशकांपासून सुरू असलेल्या लढाईवरील चर्चेसाठी दोहामध्ये आहेत, तेव्हा हा हिंसाचार घडला. तथापि, अद्याप या चर्चेला कोणतेही यश मिळालेले नाही आणि दोन्ही बाजूंदरम्यान औपचारिक चर्चा सुरू झालेली नाही.

मंगळवारी झालेल्या ताज्या हिंसाचाराशी संबंधित असलेल्या घटनेत जालरेज जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला झालेल्या दोन बॉम्ब स्फोटांमध्ये किमान पाच नागरिक ठार तर नऊ जण जखमी झाले. यादरम्यानच, सोमवारी लोगर प्रांतात बंदूकधार्‍यांच्या हल्ल्यात जिल्हा गव्हर्नरचा मृत्यू झाला.

हेही वाचा - लिबियाच्या सामूहिक कबरींमध्ये सापडले 12 मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.