ETV Bharat / international

व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन, लष्करी छावणीवर दरड कोसळून 22 जवान दबले - व्हिएतनाम मुसळधार पावसामुळे भूस्खलन न्यूज

सततच्या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामच्या मध्य भागात रविवारी भूस्खलन झाले. सैन्याची छावणी याच्या तडाख्यात सापडून 22 सैनिक ढिगाऱ्याखाली दबले. कुआंग ट्राय प्रांतात ही दरड कोसळली. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे मध्य व्हिएतनाममध्ये सर्वत्र पूर आला आहे. हवामान खात्याने आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन
व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन
author img

By

Published : Oct 18, 2020, 6:44 PM IST

हनोई - सततच्या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामच्या मध्य भागात रविवारी भूस्खलन झाले. सैन्याची छावणी याच्या तडाख्यात सापडून 22 सैनिक ढिगाऱ्याखाली दबले. कुआंग ट्राय प्रांतात ही दरड कोसळली. येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लष्कराच्या छावणीवरच ती कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे, असे वृत्त व्हिएतनामच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

या घटनेनंतर बचाव पथक वेगाने कामाला लागले असून आतापर्यंत आठ जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. तर, 22 जण अद्याप दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन
व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन

हेही वाचा - झी जिनपिंग यांच्या दारिद्र्य निर्मूलनावर भर देण्याच्या सूचना

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुमारे 100 जणांचे पथक मदत व बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भागात आठवड्याभरापासून पाऊस पडत आहे. याआधी गुरुवारी थुआ थिएन-ह्यू या ट्रायजवळच्या प्रांतात भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. या 13 मृतदेहांपैकी 11 सैन्य अधिकारी असल्याचे समजले आहे.

तर, एका जलविद्युत प्रकल्प बांधकाम ठिकाणी 16 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे. हा भाग दुर्गम असून येथे अद्याप पोहोचणे शक्य झालेले नाही. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे मध्य व्हिएतनाममध्ये सर्वत्र पूर आला आहे. हवामान खात्याने आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.