कीव (यूक्रेन) - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelensky ) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रशियाचा आपल्या देशावर होणारा लष्करी हल्ला थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताकडे राजकीय पाठिंबा मागितला. युक्रेन विरुद्ध रशियाच्या "आक्रमक वर्तनाचा" "तीव्र निषेध" करणार्या अमेरिकेच्या ठरावावर भारताने UNSC मध्ये मतदान करण्यापासून दूर राहिल्यानंतर काही तासांनंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संभाषण झाले.
ट्विटमध्ये काय?
झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणे झाले आहे. युक्रेनच्या रशियन आक्रमणाचा प्रतिकार करण्याबाबत त्यांना सांगण्यात आले. तसेच यूक्रेनच्या भूमीवर एक लाखांहून अधिक आक्रमक आहेत. ते निवासी इमारतींवर अंदाधुंद गोळीबार करत आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने आम्हाला राजकीय पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.'
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी त्यांचे भारतीय समकक्ष एस जयशंकर यांच्याशी बोलल्यानंतर आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावासाठी भारताचा पाठिंबा मागितल्यानंतर अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. टेलिफोनिक संभाषणात, कुलेबा यांनी जयशंकर यांना संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त रशियावर भारताचा प्रभाव वापरून 'लष्करी हल्ला' थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.