संयुक्त राष्ट्र - भारताने गुरुवारी सांगितले की, यावेळी 'शांततापूर्ण आणि रचनात्मक मुत्सद्देगिरी'ची गरज आहे आणि ते या प्रकरणी सर्व संबंधितांना घेईल, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (UN Ambassador T S Tirumurti) यांनी रशिया-युक्रेन तणावाच्या दरम्यान सांगितले.
रशिया-युक्रेनच्या वाढत्या तणावादरम्यान, भारताने गुरुवारी सांगितले की, "शांततापूर्ण आणि रचनात्मक मुत्सद्देगिरीची" भूमिका आवश्यक आहे. आणि ते या प्रकरणात सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. भारताने स्पष्ट केले की, युक्रेनमधील 20,000 हून अधिक भारतीय नागरिकांची सुरक्षा करणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे.
टीएस तिरुमूर्तींनी दिले स्पष्टीकरण
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (UN Ambassador T S Tirumurti) यांनी रशिया - युक्रेनमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सांगितले की, तणाव त्वरित कमी करता येईल असा तोडगा काढला जाईल. तिरुमूर्ती (UN Ambassador T S Tirumurti) म्हणाले की, भारत सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. राजनैतिक संवादातूनच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे आमचे मत आहे. ते म्हणाले, "सर्व देशांचे कायदेशीर सुरक्षेचे हित लक्षात घेऊन, तणाव ताबडतोब कमी करता येईल आणि या प्रदेशात आणि त्यापलीकडे दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवता येईल असा उपाय शोधण्यात भारताचे हित आहे," ते म्हणाले.
हेही वाचा - Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन अमेरिका नाटो चर्चा करण्यास उत्सुक