ETV Bharat / international

जकार्ताहून उड्डाण केलेले विमान कोसळले पाण्यात - plane missing news

आता ते जकार्तापासून जवळ असलेल्या परिसरात कोसळल्याचे वृत शिनहुआ वृत्तवाहिनीने दिले आहे.

plane
plane
author img

By

Published : Jan 9, 2021, 7:37 PM IST

जकार्ता - श्रीविजय एअर फ्लाइटचे बेपत्ता विमान पाण्यात कोसळले असल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथून ५९ प्रवाशांना घेऊन विमानाने टेक-ऑफ केले होते. मात्र त्याचा संपर्क तुटला होता. आता ते जकार्तापासून जवळ असलेल्या परिसरात कोसळल्याचे वृत शिनहुआ वृत्तवाहिनीने दिले आहे.

विमानात होते ५९ प्रवासी

मानवी शरीराचे अवयव आणि विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती त्रिसुला कोस्टगार्ड शिपचे कॅप्टन एको सूर्या हदी यांनी दिली आहे. विमानात एकूण ५९ प्रवासी होते. त्यात ६ मुलांचा समावेश होता. इंडोनेशियातील वृत्तपत्र रिपब्लिकाने ही माहिती दिली आहे.

...त्यानंतर शोधमोहीम सुरू

सुरुवातीला मिळालेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या स्रीविजया एअरच्या बोइंग ७३७-५०० विमानाचा संपर्क तुटला आहे. विमानाने सोकार्नो-हत्ता विमानतळावरून टेकऑफ केले. ते पश्चिम कलिमंतनची राजधानी पोंटिआनाककडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, मच्छीमारांना जकार्ताच्या उत्तरेस पाण्यामध्ये विमानाचे अवशेष दिसून आले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

टेकऑफच्या ४ मिनिटांतच..

इंडोनेशियन परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले, की बोइंग 737-500ने जकार्ता येथून सकाळी 1:56 वाजता उड्डाण केले. पहाटे 2:40 वाजता विमानाचा नियंत्रण टॉवरशी संपर्क तुटला. स्वीडिश इंटरनेट आधारित सर्व्हिस फ्लाइटरडार २४च्या मते, श्रीविजय एअरफ्लाइट एसजे१८२ने टेकऑफच्या ४ मिनिटांनंतर एका मिनिटाच्या आत १० हजार फुटांहून अधिक उंची गमावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.