सोल - दशिण कोरियाच्या खासदारकीची निवडणूक बुधवारी पार पडली. कोरोना व्हायरसच्या भीतीखाली ही निवडणूक झाली. यावेळी मतदारांनी तोंडाला मास्क बांधत मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती लावली होती.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा फटका दक्षिण कोरियालाही बसला आहे. अशातच येथील खासदारकीची निवडणूक झाली. यावेळी मतदारांनी कोरोना विषयीची सर्व खबरदारी घेत मतदार केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, राष्ट्रपती मून जे-इन यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यासाठी केलेल्या आवाहनांना सरकारने विरोध केला होता. त्यानंतर बुधवारी ही निवडणूक पार पडली.