काबूल - अफगाणिस्तानात 2 आयईडी स्फोटांनंतर काबूलच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या 14 रॉकेट हल्ल्यांमध्ये 6 जण ठार आणि 25 हून अधिक जखमी झाले आहेत.
'रॉकेट हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आणि एका आयईडी स्फोटात एकाचा मृत्यू झाला,' असे वृत्त सिन्हुआने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.
'दोन लहान ट्रकमधून 14 रॉकेट सोडण्यात आले. त्यांची स्थाने वेगवेगळी होती,' अशी माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरीन यांनी सिन्हुआला दिली. काबूल पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने ट्रकची जागा शोधून काढली आणि उर्वरित रॉकेट निकामी केली, असे ते म्हणाले.
हेही वाचा - अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, हे रॉकेट काबूलच्या वजीर अकबर खान आणि शाह-ए-नवाह भागात पडले. यापूर्वी शहरातील चहेल सुतुन आणि आर्जन प्राइस भागात 2 स्फोट झाले.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांपैकी 5 जणांपैकी एक सुरक्षा दलाचा सदस्य होता. रॉकेट हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी बहुतेकांना काबूलच्या शहर-ए-नवाह भागातील आपात्कालीन रुग्णालयात नेण्यात आले.
अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्याचबरोबर तालिबानने यामागे त्यांचा हात असल्याचे नाकारले आहे.
गेल्या काही महिन्यांत तालिबानी बंडखोर आणि इस्लामिक स्टेटने काबूलसह अफगाणिस्तानातील बड्या शहरांमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.
हेही वाचा - 2021चा उन्हाळा जवळजवळ सामान्य असेल : बिल गेट्स