जाकार्ता - चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी सिनोवॅक बायोटेकने बनवलेल्या कोविड -19 लसीचे 18 दशलक्ष डोस गुरुवारी इंडोनेशियात दाखल झाले. याची पुष्टी इंडोनेशियातील शासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
सिन्हुआच्या वृत्तानुसार, 6 डिसेंबरला 12 लाख डोसची पहिली तुकडी पोहोचली होती. आता आलेली लसीची दुसरी तुकडी असल्याचे इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रेटनो मासुर्डी यांनी सांगितले. 'इंडोनेशियात सिनोवॅक लसीचे आधीच 30 लाख डोस आहेत,' असे त्यांनी व्हर्चुअल पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोग्यमंत्री बुदी गुनादी सादिकिन म्हणाले की, कोविड - 19 साथीच्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण करणे ही इंडोनेशियाची एक महत्त्वाची रणनीती आहे.
हेही वाचा - ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ
आपल्या लोकसंख्येची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी इंडोनेशियाने 2021 मध्ये आपल्या देशातील 18 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची योजना आखली आहे.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत लसीकरणाचे पहिले सत्र घेण्यात येणार असून यात 13 लाख वैद्यकीय कर्मचारी, 1.74 कोटी सार्वजनिक कर्मचारी आणि 2.15 कोटी वृद्धांचा समावेश आहे.
लसीकरणाचे दुसरे सत्र एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत चालू राहील, ज्यामध्ये 6.39 कोटी कमकुवत गटातील लोक आणि इतर गटातील 7.74 कोटी लोकांना लस दिली जाईल.
हेही वाचा - 2021 मध्ये अंदाजे 14 कोटी मुले जगात जन्माला येतील - युनिसेफ