ETV Bharat / international

रशियाच्या सायबेरियात कोळसा खाणीत आग; 52 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 26, 2021, 9:46 AM IST

सायबेरियातील कोळशाच्या खाणीला लागलेल्या आगीत गुरुवारी 52 खाण कामगार आणि बचावकर्ते ठार झाल्याचे रशियन वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे.

Russia
रशिया

मॉस्को - रशियाच्या ( Russia ) सायबेरियातील कोळशाच्या खाणीला ( Coal mining )लागलेल्या आगीत गुरुवारी 52 खाण कामगार आणि बचावकर्ते ठार झाल्याचे रशियन वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. आतापर्यंत शोध पथकाला 14 मृतदेह (Russia Mine Incident) सापडले आहेत. तर खाणीत स्फोटक मिथेन वायू आणि आगीतून विषारी धुके जास्त प्रमाणात निर्माण झाल्याने 38 व्यक्तींचा शोध सुरक्षिततेच्या कारणास्वत थांबवण्यात आला आहे.

सायबेरियाच्या केमेरोवो प्रदेशातील लिस्तव्याझनाया खाणीत एकूण 285 लोक होते. बचाव पथकांनी 239 खाण कामगारांना बाहेर काढले. यात 49 जण जखमी झाले. मिथेनचे स्फोट दुर्मिळ असतात. मात्र, खाणीत हा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.

घटनेचा तपास करण्यासाठी रशियाच्या तपास समितीने चौकशी सुरू केली आहे. खाण संचालक आणि दोन वरिष्ठ व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना सर्व आवश्यक मदत देण्याचे आदेश सरकारला दिले. 2016 मध्ये, रशियाच्या सुदूर उत्तरेकडील कोळसा खाणीत मिथेन स्फोटांत 36 खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी देशातील 58 कोळसा खाणींच्या सुरक्षिततेचे विश्लेषण केले असून त्यापैकी 20 खानी या 34 टक्के असुरक्षित असल्याचे घोषित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.