मेलबर्न - कोरोना काळात वेगवेगळ्या घटना घडल्या. यातील काही चांगल्या होत्या तर काही वाईट. यात काही घटना तर विचित्रच होत्या. आता अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. कोरोना काळात ऑस्ट्रेलियामध्ये एक असा फंगस म्हणजे बुरसी पाहायला मिळाली आहे, ज्याचा आकार चक्क झोम्बीच्या हातासारखा आहे. विशेष म्हणजे हा फंगस लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हा फंगस मृत मानसाच्या सडलेल्या हाताच्या बोटांसारखा दिसते. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणी भागातील एका बेटावर हा फंगस दिसून आला आहे. याची उगवण तुटलेल्या झाडावर होते.
झोम्बी फिंगरला वैज्ञानिक भाषेत हायपोक्रोपोसिस एम्पलेकटेंस असे म्हटलं जाते. याला ऑस्ट्रेलियात टी-ट्री फिंगर्स या नावाने देखील ओळखले जाते. याला पहिल्यानंतर असे वाटते की, झाडांवर बोट उगवून आली आहेत की काय? हे फंगस मृताच्या सडलेल्या हाताच्या बोटांचा आभास घडवून आणतात.
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामधील काही मोजक्या भागात झोम्बी फिंगर्स म्हणजे टी-ट्री फिंगर्स पाहायला मिळतात. महत्वाची बाब म्हणजे, हे खूप दुर्मिळ आहे. ऑस्ट्रेलियाचे रॉयल बॉटनिक गार्डेन्स व्हिक्टोरियाने (आरबीजीव्ही) याची तपासणी करत स्पष्टोक्ती दिली आहे की, ऑस्ट्रेलियातील दोन ठिकाणी झोम्बी फिंगर्सने जखडलेली झाडे पाहायला मिळाली आहेत.
आरबीजीव्हीचे संशोधक मायकल अमोर यांच्या म्हणण्यानुसार, झोम्बी फिंगर्स पाहिल्यानंतर माणूस प्रथम घाबरेलच. त्याचा आकार आणि त्याची रचना त्याला वाढण्यास मदत करते. हा फिंगर्स तुटलेल्या किंवा कोळमडून पडलेल्या झाडांवर उगवतो.
झोम्बी फिंगर्स तुटलेली किंवा मृत झाडांना आपला शिकार बनवतो. या फिंगर्सना लार्वा आणि अन्य कीडे मोठ्या चवीने खातात. त्याच्यासाठी हा फिंगर्स नाष्ट्यासारखा आहे. मायकल म्हणातात की, ही एक किचकट प्रक्रिया आहे. सोबत हे कीड्याच्या परिस्थितीच्या तंत्राचा एक महत्वपूर्ण भाग आहे.
आरबीजीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंच आयलँडमधील नॅशनल पार्कमध्ये देखील टी-ट्री झोम्बी फिंगर्स पाहायला मिळाले आहेत. या पार्कमध्ये जवळपास १०० हून अधिक झोंम्बी फिंगर्स मिळाले. ही संख्या ऑस्ट्रेलियात मिळालेल्या झोम्बी फिंगर्सपेक्षा जास्त आहे.
वातावरणात उष्णता वाढल्याने ही फिंगर्स नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे मायकल यांनी सांगितलं. पण सद्यघडीला हे फिंगर्स आढळल्याने यावर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे, असेही मायकल यांनी सांगितलं.
हेही वाचा - Doctors Day 2021 : आज डॉक्टर्स डे, जाणून घ्या का साजरा करतात...
हेही वाचा - DOCTORS DAY कोरोनात लोकांचे प्राण वाचविल्याने पंतप्रधानांकडून डॉक्टरांचे कौतुक