ETV Bharat / international

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे क्वेट्टामध्ये आंदोलन - विश्लेषण

ऑक्टोबर महिन्यात गुजरांवाला, पंजाब, कराची आणि सिंध अशा विविध ठिकाणी पीडीएमने केलेली आंदोलने लोकशाहीची प्रेरणा देत होती, असेही शरीफ यावेळी म्हणाले. रविवारी बलुचिस्तानातील क्वेट्टामध्ये झालेला विरोध हा पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पीडीएमचा आवाका वाढत असल्याची साक्ष देत आहेत. हा इम्रान खान सरकारला अप्रत्यक्षपणे दिलेला शह आहे, असेही ते पुढे म्हणाले...

Quetta protest by Pakistan Democratic Movement: An analysis
पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे क्वेट्टामध्ये आंदोलन - विश्लेषण
author img

By

Published : Oct 27, 2020, 12:35 PM IST

हैदराबाद : पाकिस्तानमधील सध्याच्या पीटीआय सरकारविरोधात एकत्र आलेल्या ११ राजकीय पक्षांच्या युतीने अर्थातच पीडीएमने (पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी क्वेट्टा येथे तिसऱ्यांदा आंदोलन केले आहे. हे आंदोलन पाकिस्तानच्या अंतर्गत सत्ताकारणात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलाचे द्योतक मानले जात आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही लंडन येथून व्हिडीओ-लिंकद्वारे सडेतोड भाषण देवून पाकिस्तानचे ज्येष्ठ आणि अनुभवी राजकीय नेते या नात्याने पून्हा एकदा राजकीय ‘आखाड्यात’ (कुस्तीचे मैदान) उतरण्याचे संकेत दिले आहेत. १९९९ मध्ये जनरल मुशरफ लष्करप्रमुख झाल्यापासून, त्यांचीही लष्कराने प्रसारमाध्यमात बदनामी केली होती. तसेच त्यांना अटक करुन तुरुंगातही धाडले होते.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानमधील सध्याचे पीटीआय सरकार ऑगस्ट २०१८ मध्ये निवडून आले. हे सरकार रावळपिंडीतील लष्कराच्या आशीर्वादाने सत्तेत आले होते, यात तिळमात्र शंका नाही. म्हणूनच पीएम खान सध्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या उपकाराची परतफेड करताना दिसत आहेत. पीएम खान यांनी बाजवा यांचा सेवा कार्यकाल वाढवून दिला आहे, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान एकमेकांवर अवलंबून राहणे, हे इस्लामाबाद- रावळपिंडी संबंधासाठी नवे नाही. गंमतीचा भाग म्हणजे, नोव्हेंबर १९९० मध्ये जेव्हा नवाझ शरीफ पहिल्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते, तेंव्हा त्यांच्याकडे देखील एक ‘जनतेतला नेता’ म्हणूनच पाहिले गेले होते आणि लष्कराने देखील त्यांना ‘पसंती’ दिली होती.

इम्रान खान सरकारने गेल्या दोन वर्षात केवळ राजकीय विरोधकांना लक्ष्य बनवण्याच्या एकाच अजेंड्यावर काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या गलथान कारभारावर लोकं नाराज असून त्यांच्या मनात असंतोष वाढत चालला आहे. परिणामी पाकिस्तानच्या विविध रस्त्यांवर आंदोलने आणि निषेध मोर्चे काढली जात आहेत. हेच मुळ कारण होतं, ज्यामुळे सप्टेंबरमध्ये पीडीएमची स्थापना झाली. पीडीएमच्या युतीमध्ये पीएमएल-एन (पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ); पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी); JuI-F (जमीअत उलेमा- ए-इस्लाम-फजलूर) आणि पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी आदी महत्त्वाच्या राजकीय विरोधी पक्षांचा समावेश आहे.

पंतप्रधान इम्रान खान विरोधी युतीचे अध्यक्ष जमीअत उलेमा-ए-इस्लाम-फजलूरचे अनुभवी पश्तून नेते फजलूर रेहमान आहेत. त्यांच्यासोबतच इतर तरुण तडफदार नेत्यांमध्ये पीएमएल-एन च्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांचा समावेश आहे. त्या नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत. तसेच पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (झुल्फिकार अली भुट्टो यांचे नातू) यांच्याही यामध्ये समावेश आहे. झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान होते, ज्यांना जनरल झिया उल हक यांनी फाशावर पाठवले. शिवाय ते बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आहेत. बेनझीर भुट्टो याही पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान होत्या, ज्यांची डिसेंबर २००७ मध्ये हत्या करण्यात आली.

पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या सैन्याच्या दडपशाहीविरूद्ध मतदारांची वैधानिक ताकदीची आठवण करून देत, तीन वेळा माजी पंतप्रधान असलेल्या नवाझ शरीफ यांनी असे प्रतिपादन केले की: “हा उत्साह पाहून मला आता खात्री वाटते की, येथून पुढे कोणीही लोकांच्या मताचा अनादर करू शकणार नाही. मला गुजरांवाला आणि कराची येथे हा उत्साह पाहायला मिळाला. हाच उत्साह मी आता क्वेट्टामध्ये पाहत आहे.”

ऑक्टोबर महिन्यात गुजरांवाला, पंजाब, कराची आणि सिंध अशा विविध ठिकाणी पीडीएमने केलेली आंदोलने लोकशाहीची प्रेरणा देत होती, असेही शरीफ यावेळी म्हणाले. रविवारी बलुचिस्तानातील क्वेट्टामध्ये झालेला विरोध हा पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पीडीएमचा आवाका वाढत असल्याची साक्ष देत आहेत. हा इम्रान खान सरकारला अप्रत्यक्षपणे दिलेला शह आहे, असेही ते पुढे म्हणाले.

पीडीएमच्या भूमिकेतील विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच - माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उघडउघड लष्कराच्या अनैतिकतेवर तोफ डागली आहे. त्याचबरोबर स्वतः च्या हद्दपारीचा दोषही त्यांनी जनरल बाजवा यांच्या माथी मारला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी गुजरांवाला येथे पीडीएम कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवाझ शरीफ यांनी लष्कराचे वर्णन ‘सत्तेवरील सत्ता’ असे केले. तर बाजवा यांनी न्यायव्यवस्थेशी संगनमत करून त्यांना पदावरून हटवले आणि त्याजागी इम्रान खान यांची नियुक्ती केली. यासाठी निवडणुकीत गडबड करण्यात आली असा आरोप नवाझ शरीफ यांनी बाजवांवर केला. याचे वर्णन त्यांनी बेकायदेशीरपणे केलेले सत्तांतर असे केले.

अगदी पाकिस्तानी मापदंडानुसारही हस्यास्पद वाटतील अशा क्षुल्लक आरोपाखाली, पाकिस्तानी रेंजर्सने (पाक सैन्य नियंत्रित) कराची येथील पीडीएमच्या निषेधानंतर (१८ ऑक्टोबर) कराचीतील उच्च पोलीस अधिकाऱ्याला धमकावले आणि नवाझ शरीफच्या जावयाला अटक केली. त्यामुळे सिंध पोलीस महानिरीक्षक मुश्ताक मेहरन हे ‘गैरवर्तन आणि मानहानी’ केल्याच्या निषेधार्थ रजेवर गेले आहेत. त्यांच्या या कृतीचे अनुकरण करत त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनीही रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एक अतिशय विसंगत परिस्थिती उद्भवली होती, ज्यामध्ये सिंध पोलीस आणि पाक सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती नियंत्रणात आली.

या प्रकरणाची चौकशी करून याचा अहवाल दहा दिवसांत (३० ऑक्टोबरपर्यंत) सादर केला जाईल, यामुळे पोलिसांच्या भावनातील कडवटपणा कमी होण्यास मदत होत आहे आणि आयजी पोलिसांनीही त्यांची निषेध रजा आणखी वाढवली आहे. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे अधोरेखित होत आहे. या कराची घटनेबद्दल क्वेट्टामध्ये बोलताना मरियम नवाझ म्हणाल्या की, “आयजींचे (इन्सपेक्टर जनरल) ज्या प्रकारे अपहरण केले गेले, आणि ज्या तऱ्हेने त्यांनी माझ्या राहत्या हॉटेलमध्ये आणि खोलीत छापा टाकण्यात आला.” यावरून ‘सत्तेवरील सत्ता’ काय असते? याची स्पष्ट लक्षणे दिसत आहेत. पुढे या घटनेला पाक सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांविरूद्ध वर्षानुवर्षे खदखदणाऱ्या स्थानिक बलुच लोकांच्या असंतोषाचा संबंध जोडत, त्या पुढे म्हणाल्या की, “जेव्हा देशातील आया-बहिणींच्या खोल्या तोडल्या जातात तेव्हा आपल्या विरोधकांची मानसिक स्थिती काय असते ? हे बलुचिस्तानमधील लोकं समजू शकतात. या घटनेतून त्यांनी ‘सत्तेवरील सत्ता’ काय असते याचे प्रात्यक्षिक उदाहरणचं संपूर्ण देशासमोर ठेवले आहे. ”

पंतप्रधान इम्रान खान हे जनशक्ती एकवटून सत्तेत यणे, हे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छुप्या पाठींब्यामुळे हे शक्य झाले होते. कारण त्यांनाही पंतप्रधानाच्या खुर्चीत एक नम्र आणि जनतेतला नेता बसवायचा होता. जेणेकरून ‘सत्तेवरील सत्ता’ आणि रावळपिंडी-इस्लामाबाद संबंध कायम राखता येतील.

जनरल बाजवा यांच्या सेवा कार्यकालात देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे आणि पुढील लष्करप्रमुख कसा निवडला जाईल? यासंबधित नवीन नियमांमुळे सध्या पाकिस्तानी सैन्यात बराच गोंधळ उडाला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांना कोवीड महामारी व्यतिरिक्त अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तसेच पाकिस्तानमधील लोकशाहीचा खरा चेहरा म्हणवून घेणाऱ्या इम्रान खान यांना सध्या लोकांच्या प्रचंड संतापाला सामोरे जावे लागत आहे. हे क्वेट्टामधील घडामोडींवरून तरी स्पष्ट दिसत आहे.

शिवाय पाकिस्तानमध्ये देशांतर्गत सत्तेत जी काही उलथापालथ सुरू आहे. या उलथापालथीकडे दिल्ली आणि बीजिंग दोघेही आपापल्या स्वत: च्या दुर्बीनीतून नजर ठेवत आहेत.

- सी उदय भास्कर (संचालक, सोसायटी फॉर पॉलिसी स्टडिज)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.