ETV Bharat / international

पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार - भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी

पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींचा अफगाणिस्तानातील कंधारमध्ये कव्हरेज दरम्यान मृत्यू झाला. सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते.

Indian photojournalist
दानिश सिद्दीकी
author img

By

Published : Jul 16, 2021, 2:13 PM IST

Updated : Jul 16, 2021, 8:06 PM IST

कंधार - दानिश सिद्दिकी या भारतीय पत्रकाराचा वृत्ताकंन करत असताना अफगाणिस्तानात मृत्यू झाला आहे. दानिश सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. सिद्दीकींचा मृत्यू कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक भागात झाला आहे. दानिश सिद्दिकी हे गेल्या काही दिवसांपासून कंधारमधील परिस्थितीचे वृत्तांकन करत होते. भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडझे यांनी सिद्दीकीच्या मृत्यूविषयीचे ट्विट केले.

सिद्दीकींच्या मृत्यूबद्दलची कुटुंबीयांनी माहिती दिली

रॉयटर्सचे संपादक अलेस्नद्रा गलोनी यांनी सिद्दीकीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'दानिश हा उत्कृष्ट पत्रकार होतो. तो एक चांगली पती, वडील आणि सहकारी होता. दानिच्या कुंटुंबीयांबद्दल आमची सहानुभूती आहे'.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संवाद साधल

तीन दिवसाअगोदर केलं होतं ट्विट -

दानिश आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कंधारमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचे वृत्ताकंन करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यासंदर्भात त्यांनीच तीन दिवसाअगोदर ट्विटरवर माहिती दिली होती. हल्ल्यातून सुदैवाने मी बचावलो, असे ते म्हणाले होते. तसेच 2018 मध्ये मिळालेल्या पुलित्झर पुरस्काराचा उल्लेख करत रोहिंग्या निर्वासितांच्या संकटावेळी गाडीमध्ये प्रवास केला होता. त्याला सुद्धा कसे लक्ष्य केले होते, याबाबतची माहिती दिली होती. यापूर्वीही सिद्दीकी यांनी एका चकमकीची माहिती रॉयटर्सला दिली होती. तसेच त्यादरम्यान हाताला जखम झाल्याचेही सांगितले होते. दानिश सिद्दीकी हे अफगाण लष्करासोबत होते आणि तेथील तालिबानींच्या कारवायांचं वृत्तांकन करत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला.

  • THREAD.
    Afghan Special Forces, the elite fighters are on various frontlines across the country. I tagged along with these young men for some missions. Here is what happened in Kandahar today while they were on a rescue mission after spending the whole night on a combat mission. pic.twitter.com/HMTbOOtDqN

    — Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दानिश सिद्दीकीची कारकीर्द -

दानिशने दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठातील अर्थशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याचठिकाणी 2007 मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. एका वृत्तवाहिनीमध्ये दानिशने वार्ताहर म्हणून कामास सुरूवात केली. त्यानंतर 2010 मध्ये रॉयटर्स या संस्थेत रूजू झाले. दानिश सिद्दीकी हा भारतातील रॉयटर्सच्या मल्टीमिडीया टीमचे प्रमुख होते. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अंत्यसंस्काराचे विनाशकारी दृश्य ड्रोननं टिपून देशाचे लक्ष वेधले होते. 2018 मध्ये सिद्दीकी यांनी आपला सहकारी अदनान अबीदी यांच्यासह पुलित्झर पुरस्कार जिंकला होता. त्यांनी रोहिंग्या निर्वासितांचे प्रभावी वृत्तांकन केले होते.

  • Deeply disturbed by the sad news of the killing of a friend, Danish Seddiqi in Kandahar last night. The Indian Journalist & winner of Pulitzer Prize was embedded with Afghan security forces. I met him 2 weeks ago before his departure to Kabul. Condolences to his family & Reuters. pic.twitter.com/sGlsKHHein

    — Farid Mamundzay फरीद मामुन्दजई فرید ماموندزی (@FMamundzay) July 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अफगाणिस्तानात पुन्हा संघर्ष -

यापूर्वी, अफगाणिस्तानच्या कंधार येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील सुमारे 50 मुत्सद्दी आणि इतर कर्मचाऱ्यांना कंधार शहराजवळ तीव्र लढाई सुरू असल्याने बाहेर काढण्यात आले होते. सुमारे दोन दशकांनंतर अमेरिकेने आपले सैन्य बाहेर काढल्याने तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jul 16, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.