ETV Bharat / international

पाकिस्तानने पुन्हा खुपसलं नाक; आसाम एनआरसीवरून केलं वादग्रस्त वक्तव्य - मोदी सरकारचा नियोजनबद्ध डाव

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर जोरदार टीका केली.

आसाम एनआरसी
author img

By

Published : Sep 1, 2019, 10:28 AM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर जोरदार टीका केली. मात्र, जगाने काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले. एकदा तोंडावर आपटूनही पाकिस्तानचे मन अजून भरलेले नाही. आसाममधील नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमावर आता इम्रान यांनी टीका केली आहे. मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी मोदी सरकारचा हा नियोजनबद्ध डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • Reports in Indian and international media on Modi Govt's ethnic cleansing of Muslims should send alarm bells ringing across the world that the illegal annexation of Kashmir is part of a wider policy to target Muslims.https://t.co/QmjTDyaGVV

    — Imran Khan (@ImranKhanPTI) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इम्रान खान यांनी नागरिकत्व नोंदनी कार्यक्रमावर टि्वट केले आहे. मोदी सरकार भारतातील मुस्लीम बांधवांना लक्ष्य करत आहे.काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय आणि आसाममधील नागरिकत्व नोंदणी प्रकारातून भारत सरकार मुस्लीम समाजाला लक्ष्य करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कटू नितीची जगभराने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा - चक्क एका पाकिस्तानी नेत्याने गायले 'सारे जहाँ से अच्छा'

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला असून भारताला युद्धाची धमकी देत आहे. यापुर्वी काश्मीरमधील कलम 370 रद्द करून मोदींनी ऐतिहासिक चूक केली आहे. काश्मीर प्रकरणी आपण कोणत्याही थराला जाऊ' अशी इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती.

हे ही वाचा - पाकिस्तान वरमला..! भारताबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार, पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी शनिवारी जाहीर झाली. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.