ETV Bharat / international

पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम' आणि दोन्ही देशांतील वार्षिक बैठकीसाठी ते रशियाला गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:56 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:56 AM IST

मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाच्या पूर्वेकडे असलेल्या वॅलडिव्होस्टॉक आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' ने सन्मानित करण्यात आले. तसेच 'फार इस्टर्न फेडरल युनिवर्सिटी'मध्ये आयोजित कार्यक्रमात भारतीय लोकांनी मोदींचे जोरदार स्वागत केले.

हेही वाचा - फिट इंडिया मूव्हमेंट: तुम्ही निरोगी रहाल तर देश सुदृढ बनेल - मोदी

भारत रशियामध्ये होणाऱ्या २० व्या वार्षिक बैठकीसाठी मोदी गेले आहेत. तसेच रशियामध्ये होणाऱ्या 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम' या बैठकीसाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतीन यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय, आणि समान हितसंबध असणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

हेही वाचा - भारतासोबत चर्चेतून कमी करा तणाव, ट्रम्प यांनी इम्रान यांना फटकारले

संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, उर्जा, उद्योग आणि दळवणवण प्रकल्प यासंबधीत करारांवर दोन्ही देश सह्या करणार आहेत. भारत रशिया संरक्षण आणि नागरी आण्विक उर्जा क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करू शकतात. दोघांमध्ये असलेल्या मैत्रिपूर्ण संबधामुळे हे शक्य असल्याचे मोदी म्हणाले.

Intro:Body:

nat

Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.