इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांनी इमरान खान सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. कारागृहात असताना प्रशासनाने त्यांच्या बाथरूममध्ये एक कॅमेरा लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान इमरान खान निरुपयोगी आहेत. पाकिस्तानमधील घडामोडींविषयी ते अनभिज्ञ असल्याचे मरियम नवाज म्हणाल्या.
पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही -
मरियम नवाज म्हणाल्या, चौधरी साखर गिरणी प्रकरणात गेल्यावर्षी तुरूंगात असताना त्यांना तुरूंगात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. तुरुंगात माझ्या कक्षात एक कॅमेरा देखील होता. मी दोनदा तुरूंगात गेले. जर मी स्त्री या नात्याने माझ्यावर झालेल्या अन्याय सांगितला. तर प्रशासनातील लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुरुंगात माझ्यावर अन्याय झाला आहे. प्रशासनातील लोक तिच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश करत होते. नवाज शरीफ यांच्यासमोरच त्यांच्या मुलीचे अपहरण करत होते. अशात पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही.
पंतप्रधान इमरान खान निरुपयोगी -
पंतप्रधान इमरान खान निरुपयोगी आहेत. त्यांची लक्ष वेधून घेण्याची भूमिका निरुपयोगी आहे. त्यांच्याकडे कोणीही लक्षदेखील देत नसल्याचे मरियम म्हणाल्या. तसेच मरियम यांनी इमरान खान यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. इमरान खान यांना एवढी भीती वाटत होती की त्यांनी माझ्या बाथरूममध्येही छुपे कॅमेरे लावल्याचे मरियम म्हणाल्या.
लष्कराशी चर्चेसाठी तयार-
देशातील राजकीय तणाव कमी करण्यासाठी आपण लष्कराशी चर्चेसाठी तयार आहोत. परंतु ही चर्चा संविधानाच्या चौकटीत राहूनच होईल. याव्यतिरिक्त ही चर्चा लोकांसमोर होईल. लपून कोणतीही चर्चा होणार नाही, असे देखील मरियम म्हणाल्या.
इमरान खान यांना त्यांच्या देशात काय चालले आहे, माहित नाही-
कराची घटनेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की त्यांचा दरवाजा तोडण्यात आला होता. त्यांचा नवरा सफदरला अटक करण्यात आली होती. तसेच सिंधच्या पोलीस महानिरीक्षकांचे अपहरण झाले होते. तरीही पंतप्रधान इमरान खान यांना त्यांच्या देशात काय चालले आहे, हे माहीत नाही.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ सरकारवर टीका करताना पीएमएल-एनचे उपाध्यक्ष म्हणाले की, जर अधिकारी खोलीत घुसतात आणि वडील नवाज शरीफ यांच्यासमोर मुलीला अटक करतात. तिच्यावर वैयक्तिक हल्ले करतात. तर महिला पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीत.
हेही वाचा- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत सात ठार
हेही वाचा- जवानांसह दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी जैसलमेरमध्ये दाखल