ETV Bharat / international

वडिलांचा खून करणाऱ्या 'त्या' तीन बहिणींच्या बाजूने जनआंदोलन - abusive father murder

या तिघींचेही वय विशीच्या आतील आहे. क्रिस्टीना (१८), अँन्जेलिना(१९) आणि मारिया खचेतुरायन (२०) अशी त्यांची नावे आहेत. वडिलांच्या हत्येनंतर तिघींनाही अटक झाली. त्यांच्यावर पूर्वनियोजित कट करुन खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.

जनआंदोलन
author img

By

Published : Jul 28, 2019, 8:41 AM IST

मॉस्को - मागील वर्षी २८ जुलैच्या सांयकाळी ३ सख्या बहिणींनी चाकू, हातोड्याने हल्ला करत स्व:तच्या वडिलांचा खून केला. कारण काय तर, या तीन बहिणींच्या मते वडील आमच्यावर अत्याचार करत होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन मारहाण करायचे. शारिरीक मानसिक छळ करायचे. वडिलांच्या हत्येनंतर तिघींनाही अटक झाली. त्यांच्यावर पूर्वनियोजित कट करुन खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानुसार या तिघी बहिणींना २० वर्षापर्यंतचा तरुंगवास होऊ शकतो. यानंतर मात्र, रशियामधील सामाजिक वातावरण ढवळून निघाले.

या तिघींचेही वय विशीच्या आतील आहे. क्रिस्टीना (१८), अँन्जेलिना (१९) आणि मारिया खचेतुरायन (२०) अशी त्यांची नावे आहेत. या तिघींनी अत्याचाराला कंटाळून स्वसंर्क्षणार्थ वडिलांवर हल्ला केला. त्यामुळे तिघींवरील खुनाचे कलम काढून टाकावे म्हणून रशियातील नागरिकांनी जन आंदोलन छेडले आहे. इंटरनेट याचिकेद्वारे त्यांना पाठिंबा देण्यात येत आहे. त्यांचा खटला लढणाऱ्या वकिलाच्या कार्यालया बाहेर लोक गर्दी करत आहे. या खटल्याच्या अनुषंगाने घरगुती हिंसाचार कायदा सबंध देशामध्ये चर्चेला आला आहे. खटल्याचा तपास नीट होत नसल्याचा ठपका नागरिकांनी पोलिसांवर ठेवला आहे.

३ ऑगस्टला या तिघींच्या समर्थनार्थ नागरिक रॅलीही काढणार आहेत. खचेतुरायन बहिणींच्या बाजूने खटला लढणाऱ्या वकिलाच्या कार्यालयाबाहेर नागरिक पाठिंबा दर्शवण्यासाठी जमा होत आहेत. शनिवारी दिवसभर नागरिकांनी वकिलाच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झाले.

खचेतुरायन कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांनीही अत्याचारी वडिलांबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर रशियातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

Intro:Body:

वडिलांचा खून करणाऱ्या 'त्या' तीन बहीणींच्या बाजूने जनआंदोलन

मॉस्को - मागील वर्षी २८ जुलैच्या सांयकाळी ३ सख्या बहिणींनी चाकू, हातोड्याने हल्ला करत वडीलांचा खून केला. कारण काय तर, या तीन बहिणींच्या मते वडील आमच्यावर अत्याचार करत होते. छोट्या छोट्या गोष्टींवरुन मारहाण करायचे. शारिरीक मानसिक छळ करायचे. वडीलांच्या हत्येनंतर तिघींनाही अटक झाली. त्यांच्यावर पुर्वनियोजित कट करुन खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानुसार या तिघी बहिणींना २० वर्षापर्यंतचा तरुंगवास होऊ शकतो.  यानंतर मात्र, रशियामधील सामिजिक वातावरण ढवळून निघाले.  

या तिघींचेही वय विशीच्या आतील आहे. क्रिस्टीना (१८), अँन्जेलिना(१९) आणि मारिया खचेतुरायन (२०) अशी त्यांची नावं आहेत.

या तिघींनी अत्याचाराला कंटाळून स्वसंर्क्षणार्थ वडीलांवर हल्ला केला. त्यामुळे तिघींवरील खुनाचे कलम काढून टाकावे म्हणून रशियातील नागरिकांनी जन आंदोलन छेडले आहे. इंटरनेट याचिकेद्वारे त्यांना पाठिंबा देण्यात येत आहे. त्यांचा खटला लढणाऱ्या वकिलाच्या कार्यालया बाहेर लोक गर्दी करत आहे. या खटल्याच्या अनुषंगाने घरगुती हिंसाचार कायदा सबंध देशामध्ये चर्चेला आला आहे. खटल्याचा तपास नीट होत नसल्याचा ठपका नागरिकांनी पोलीसांवर ठेवला आहे.

३ ऑगस्टला या तीघींच्या समर्थमार्थ नागरित रॅलीही काढणार आहेत. खचेतुरायन बहिणींच्या बाजुने खटला लढणाऱ्या वकिलाच्या कार्यालयाबाहेर नागरिक पाठिंबा दर्शवण्यासाठी जमा होत आहेत. शनिवारी दिवसभर नागरिकांनी वकिलाच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज या घटनेला १ वर्ष पुर्ण झाले.

खचेतुरायन कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांनीही अत्याचारी वडीलांबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपुर्ण घटनांच्या पार्श्वभुमीवर रशियातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.