बीजिंग - वायव्य चीनमधील शानक्सी प्रांतातील शिआन शहरात गुरुवारी नवीन जातीच्या बंदिस्त पांडाचा जन्म झाला. या 111 ग्रॅम वजनाच्या पांडाचा जन्म 25 ऑगस्टला क्विनलिंग पांडा प्रजनन व संशोधन केंद्रात झाला आहे. आणखी एक पांडाचा यावर्षी शांनक्सीमध्ये जन्म झाला होता. तो सध्या 800 ग्रॅमचा आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! मेक्सिकोमध्ये विहिरीत आढळले ४४ मृतदेह
नवजात पांडाचे वजन 111 ग्रॅम आहे. जे इतर पांडाच्या जन्माच्या वेळीपेक्षा खूपच कमी आहे. सुदैवाने, या पांडाच्या आईची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आल्याचे शानक्सी अॅकॅडमी ऑफ फॉरेस्ट्रीच्या क्विनिंग रिसर्च बेसमधील ज्येष्ठ पशुवैद्य झाओ पेंगपेनग यांनी सांगितले.
याबरोबरच पांडाच्या संगोपनासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यासह, आईकडे पांडाला ठेवण्याची वेळ देखील निश्चित केली गेली आहे. असे केल्याने पांडाचे चांगले पालन होईल, असेही पेंगपेनग यांनी सांगितले.
हेही वाचा - ह्युस्टनला येवून उर्जा क्षेत्राबद्दल न बोलणे अशक्य - मोदी
मे च्या सुरूवातीला 16-वर्षाची आई लुसेंग कृत्रिम गर्भवती होती. लुसेंगचा जन्म 2003 मध्ये झाला होता. केंद्राने स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम गर्भधारणा करून पांडाना जन्म दिला आहे. आतापर्यंत, लुसेंगने 6 पांडाना जन्म दिला आहे.