ETV Bharat / international

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना पाकिस्तान सार्वजनिकरित्या फाशी देणार

संसदीय कामकाज राज्यमंत्री अली मोहम्मद खान यांनी ठराव मांडला होता. बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे क्रूर गुन्हे समोर आल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

file pic pakistan NA
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:55 PM IST

इस्लामाबाद - बाल लैंगिक अत्याचार आणि हत्येतील दोषींना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात येता येईल, असा ठराव पाकिस्तानच्या संसदेने मंजूर केला आहे. मागील काही दिवसांमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे क्रूर गुन्हे समोर आल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

संसदीय कामकाज राज्यमंत्री अली मोहम्मद खान यांनी हा ठराव मांडला होता. बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे. मात्र, पाकिस्तान पिपल्स पार्टी या ठरावापासून दूर राहिली. पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान रझा परवेज अश्रफ म्हणाले की, दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिल्याने गुन्हे कमी होत नाहीत. सार्वजनिकरित्या फाशी देण्याची प्रथा संयुक्त राष्ट्राच्या कायद्यांचे उल्लंघन करते.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनीही या ठरावाचा निषेध केला आहे. सभ्य नागरी संस्कृतीतील हा एक क्रूर कायदा आहे. समाजामध्ये समतोल पाहिजे, अशा क्रूर शिक्षा त्यावर उपाय नाहीत. कट्टरदावादाचे हे एक उदाहरण आहे, असे चौधरी म्हणाले.

मागील वर्षी जुन ते जुलै महिन्यात पाकिस्तानात १ हजार ३०४ बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. बाल सुरक्षेसाठी सरकार कठोर पावले उचलत नाहीत, असा आरोप होत होता, त्यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे.

Intro:Body:

बाल लैंगिक गुन्ह्यातील दोषींना पाकिस्तान सार्वजनिक फाशी देणार  

इस्लामाबाद-  बाललैंगिक अत्याचार आणि हत्येतील दोषींना सार्वजनिक रित्या फाशी देण्यात येता येईल, असा ठराव पाकिस्तानच्या संसदेने मंजूर केला आहे. मागील काही दिवसांमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे क्रूर गुन्हे समोर आल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.  

संसदीय कामकाज राज्यमंत्री अली मोहम्मद खान यांनी हा ठराव मांडला होता. बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे. मात्र, पाकिस्तान पिपल्स पार्टी या ठरावापासून दुर राहिली. पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान रझा परवेज अश्रफ म्हणाले की, दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिल्याने गुन्हे कमी होत नाहीत. सार्वजनिक रित्या फाशी देण्याची प्रथा संयुक्त राष्ट्राच्या कायद्यांचे उल्लंघन करते.      

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनीही या ठरावाचा निषेध केला आहे. सभ्य नागरी संस्कृतीतील हा एक क्रूर कायदा आहे. समाजामध्ये समतोल पाहिजे, अशा क्रूर शिक्षा त्यावर उपाय नाही. कट्टरदावादाचे हे एक उदाहरण आहे, असे चौधरी म्हणाले.  

मागील वर्षी जुन ते जुलै महिन्यात पाकिस्तानात १ हजार ३०४ बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. बाल सुरक्षेसाठी सरकार कठोर पावले उचलत नाहीत, असा आरोप होत होता, त्यानंतर हा ठराव  मंजूर झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.