ETV Bharat / international

जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा - आईशा फारूकी - अमेरिका-तालिबान शांती चर्चा

फारूकी यांनी कोरोना विषाणू संसर्गाविषयी चीन सरकार यावर आवश्यक पावले उचलत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी विद्यार्थी आणि चीनी नागरिकांसह वुहानमधील इतर सर्व जणांना उपचार आणि इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे त्या म्हणाल्या.

आईशा फारूकी
आईशा फारूकी
author img

By

Published : Feb 7, 2020, 11:47 AM IST

इस्लामाबाद - पाकच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या आईशा फारूकी यांनी काश्मीर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, अमेरिका-तालिबान शांती चर्चेतील घडामोडींवरही पाकिस्तान बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही त्या म्हणाल्या.

'आम्ही जम्मू-काश्मीरचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत आहोत. हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परराष्ट्र कार्यालय हा मुद्दा गांभीर्याने घेत नाही, हे खरे नाही,' असे फारूकी यांनी म्हटले आहे. सध्या पाक परराष्ट्र मंत्रालयावर काश्मीरचा मुद्दा व्यवस्थितपणे न हाताळल्याबद्दल टीका होत आहे. 'पाक परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरच्या मुद्द्याकडे कधीच दुर्लक्ष केलेले नाही. आम्ही हा मुद्दा आणखी पुढे नेण्यास कटीबद्ध आहोत,' असे त्यांनी ठासून सांगितले आहे.

फारूकी यांना कोरोना विषाणू संसर्गाविषयी प्रश्न केला असता, त्यांनी चीन सरकार यावर आवश्यक पावले उचलत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी विद्यार्थी आणि चिनी नागरिकांसह वुहानमधील इतर सर्वजणांना उपचार आणि इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांना वुहानसह देशातील इतर भागांमध्ये सर्व सुविधा देण्यात येत आहेत, असे फारूकी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने भारताकडून नुकतीच करण्यात आलेली वक्तव्ये बेजबाबदार असून भारतीय लष्कराकडून असा कोणताही हल्ला झाल्यास तो निष्फळ करण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने काही आगळीक केल्यास 'पाकचे भक्कम लष्कर' त्यांना 'चांगला धडा' शिकवेल, अशा वल्गना केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी मागील महिन्यात राष्ट्रीय छात्र सेनेला दिल्लीमध्ये संबोधित करताना भारतीय लष्कराला पाकिस्तानला संपवण्यासाठी केवळ एक आठवडा ते १० दिवस पुरेसे असल्याचे म्हटले होते. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही याला दुजोरा दिला होता.

Intro:Body:

जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत नाजूक मुद्दा - आईशा फारूकी

इस्लामाबाद - पाकच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या आईशा फारूकी यांनी काश्मीर हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत नाजूक मुद्दा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, अमेरिका-तालिबान शांती चर्चेतील घडामोडींवरही पाकिस्तान बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही त्या म्हणाल्या.

'आम्ही जम्मू-काश्मीरचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत आहोत. हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत नाजूक मुद्दा आहे. परराष्ट्र कार्यालय हा मुद्दा गांभीर्याने घेत नाही, हे खरे नाही,' असे फारूकी यांनी म्हटले आहे. सध्या पाक परराष्ट्र मंत्रालयावर काश्मीरचा मुद्दा व्यवस्थितपणे न हाताळल्याबद्दल टीका होत आहे. 'पाक परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरच्या मुद्द्याकडे कधीच दुर्लक्ष केलेले नाही. आम्ही हा मुद्दा आणखी पुढे नेण्यास कटीबद्ध आहोत,' असे त्यांनी ठासून सांगितले आहे.

फारूकी यांना कोरोना विषाणू संसर्गाविषयी प्रश्न केला असता, त्यांनी चीनी सरकार यावर आवश्यक पावले उचलत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी विद्यार्थी आणि चीनी नागरिक आणि वुहानमधील इतर सर्वजणांना उपचार आणि इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांना वुहानसह देशातील इतर भागांमध्ये सर्व सुविधा देण्यात येत आहेत, असे फारूकी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने भारताकडून नुकतीच करण्यात आलेली वक्तव्ये बेजबाबदार असून भारतीय लष्कराकडून असा कोणताही हल्ला झाल्यास तो निष्फळ करण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने काही आगळीक केल्यास 'पाकचे भक्कम लष्कर' त्यांना 'चांगला धडा' शिकवेल, अशा वल्गना केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी मागील महिन्यात राष्ट्रीय छात्र सेनेला दिल्लीमध्ये संबोधित करताना भारतीय लष्कराला पाकिस्तानला संपवण्यासाठी केवळ एक आठवडा ते १० दिवस पुरेसे असल्याचे म्हटले होते. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही याला दुजोरा दिला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.