ETV Bharat / international

सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्स : पाकिस्तानने उपस्थित केला जम्मू काश्मीरचा मुद्दा - पाकिस्तानने उपस्थित केला जम्मू काश्मीरचा मुद्दा

कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी आज सायंकाळी सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी चर्चेदरम्यान पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

Pak raises Kashmir lock-down during SAARC conference

author img

By

Published : Mar 15, 2020, 8:05 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी आज सायंकाळी सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी चर्चेदरम्यान पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर खोऱ्यातून निर्बंध हटवावेत, असे ते म्हणाले.

दरम्यान चर्चेमध्ये पाकिस्तानने कोरोना विषाणूवर चिंता व्यक्त केली. 55 हजारहून कोरोना विषाणू बाधित रुग्ण तर 5 हजार 833 मृत्यू आणि 138 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणताही देश बेजबाबदार होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चर्चेत मालदीव, पाकिस्तान, अफगाणीस्तान, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि भुतान या देशाच्या नेतृत्वांनी सहभाग घेतला. यामध्ये जागतिक स्तरावर कोरोना विषाणूविरोधात पाऊले उचलण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मोदींचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.