ETV Bharat / international

दक्षिण कोरिया न्यूक्लिअर इंधन विकत घेतंय; उत्तर कोरियामधील माध्यमांचा दावा - दक्षिण कोरिया न्यूक्लिअर इंधन

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किम ह्यून-चोंग यांच्या अमेरिका भेटीवरुन या वादाला तोंड फुटले. चोंग यांची अमेरिका भेट ही अतिशय धोकादायक असून, कोरियन पेनिन्सुला प्रांतातील शांतता यामुळे नष्ट होईल. तसेच दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढेल, असे योनहॅप या वृत्तसंस्थेने म्हटले आहे..

NK media slams Seoul over alleged n-fuel purchase plan
दक्षिण कोरिया न्यूक्लिअर इंधन विकत घेतंय; उत्तर कोरियामधील माध्यमांचा दावा
author img

By

Published : Oct 18, 2020, 3:52 PM IST

सेऊल : दक्षिण कोरिया अमेरिकेकडून न्यूक्लिअर इंधन घेत असल्याचा आरोप उत्तर कोरियामधील एका माध्यम संस्थेने केला आहे. यावरुन त्यांनी दक्षिण कोरियावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली आहे. न्यूक्लिअर उर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी दक्षिण कोरिया हे इंधन विकत घेत आहे असा दावा या माध्यमाने केला आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किम ह्यून-चोंग यांच्या अमेरिका भेटीवरुन या वादाला तोंड फुटले. चोंग यांची अमेरिका भेट ही अतिशय धोकादायक असून, कोरियन पेनिन्सुला प्रांतातील शांतता यामुळे नष्ट होईल. तसेच दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढेल, असे योनहॅप या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

यापूर्वी या महिन्यात, दक्षिण कोरियामधील दोंगा इल्बो या वृत्तपत्राने किम हे न्यूक्लिअर इंधन विकत घेण्याच्या उद्देशाने अमेरिकेला गेल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. तसेच, अमेरिकेने दक्षिण कोरियाची ही मागणी फेटाळल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले होते.

सेऊलमधील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने मात्र या वृत्तास दुजोरा दिला नाही. किम यांची अमेरिका भेट ही केवळ भौगोलिक राजकारणासंबंधी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी होती, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन कोमामध्ये..?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.