काठमांडू - कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात आहे. मात्र या काळातही नेपाळने जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी यावर्षी विक्रमी 394 परवानग्या जारी केल्या आहेत. ज्या संघांनी यासाठी रीतसर अर्ज केला होता, अशा सर्वांना मोहिमेसाठी परवानगी दिली असल्याची माहिती पर्यटन विभागाच्या संचालक मीरा आचार्य यांनी दिली.
नेपाळ पर्यटन व नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारपर्यंत मोहिमेसाठी 394 परवानग्या जारी केल्या आहेत. तर 2019 मध्ये 381 मोहिमेला परवानगी देण्यात आली होती. नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे शिखरावर कोंडी निर्माण होणार असल्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. तर " मला एव्हरेस्टवरील ट्राफीकबद्दल माहिती नाही," असे आचार्य सांगितले. नेपाळला एव्हरेस्ट मोहिमेतून मोठे उत्पन्न मिळते. माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 848.86 मीटर इतकी आहे. एव्हरेस्ट चढण्याची परवानगी मिळावण्यासाठी परदेशी गिर्यारोहकाला प्रत्येकी ११ हजार डॉलर्स जमा करावे लागतात.