ETV Bharat / international

'लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार' व्यंगचित्र वाद पेटला - मोहम्मद महातीर वादग्रस्त विधान

मलेशियाचे माजी पंतप्रधान मोहम्मद महातीर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे, असे ते म्हणाले.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 29, 2020, 8:21 PM IST

क्वालालांपूर - मलेशियाचे माजी पंतप्रधान मोहम्मद महातीर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे, असे ते म्हणाले. फ्रान्सने भूतकाळात अनेक हत्याकांड केले आहेत. त्यात मुस्लिमांचाही समावेश होता. त्यामुळे आता फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार मुस्लिमांना असल्याचे ते म्हणाले. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केल्यानंतर मुस्लिम देशांतून फ्रान्सवर टीका करण्यात येत आहे.

महातीर मोहम्मद यांनी ट्विटरवर ही माहिती पोस्ट केली आहे. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅकरॉन यांच्यावर कडाडून टीका केली. लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे. मात्र, मुस्लिमांनी अद्याप सूडाच्या भावनेतून कोणतेही कृत्य केले नाही. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्यास फ्रान्सने त्यांच्या जनतेला शिकवावे, असे महातीर म्हणाले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद

फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅकरॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. मुस्लिम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे मारले.

आज चाकू हल्ल्याची घटना

चाकू हल्ल्याची घटना

फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ?

व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅकरॉन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लिम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. फ्रान्सच्या सरकारी इमारतीवर मोठ्या आकारात प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र लावण्यात आले होते.

एर्दोगान यांचे वादग्रस्त व्यंगचित्र

तुर्कस्तानचे पंतप्रधान रसेपतय्यीप एर्दोगान यांनी फ्रान्सचे पंतप्रधान एमॅन्युएल मॅकरॉन यांच्यावर टीका केली होती. मॅकरॉन यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे वक्तव्य एर्दोगान यांनी केले होते. त्यानंतर फ्रान्समधील शार्ली हेब्दो मासिकाने एर्दोगान यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केले होते. ते वादात सापडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.