बीजिंग - गेल्या 24 तासांत चीनमध्ये कोरोना संसर्ग झालेले 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील 15 जण बाहेरून आलेले आहेत. तर, दोन झिनजियांगमधून आले आहेत, अशी माहिती चीनच्या आरोग्य मंत्रालयाने 4 नोव्हेंबरला दिली.
हेही वाचा - अमेरिकेत 8 लाख 50 हजारहून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह
आता चीनमध्ये 392 सक्रिय रुग्ण आणि 2 संशयित रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त 16 हजार 572 लोक वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
दुसरीकडे, झिनजियांगमधील दोन खात्री झालेल्या प्रकरणांव्यतिरिक्त, 116 नवे लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले आहेत. ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. आता झिनजियांगमध्ये एकूण 64 कोरोना रुग्ण सापडल्याची खात्री झाली आहे. ते सर्व काश्गर प्रदेशातील आहेत. तेथे लक्षणे नसलेल्या लोकांची संख्या 345 आहे.
दरम्यान, हाँगकाँग, मकाओ आणि तैवानमध्ये कोरोनाचे एकूण 5 हजार 958 रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा - अमेरिकेत मतदानाच्या दिवशी कोरोनाचा हाहाकार; आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद