नवी दिल्ली - मेहुल चौकसीच्या अपरहरणासंदर्भात आपल्यासोबत कोणीही संपर्क साधला नाही, असे मेहुल चौकसीची गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका हिने स्पष्ट केले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही माहिती दिली. मेहुल चौकसीवर भारतीय बँकांची कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे.
ती म्हणाली, मी सर्व फोटो पाहिले, मी पाहतेय की तो आधी कसा दिसायचा आणि मी विचार करतेय की, त्याने त्याचे वजन कमी घटवले आहे. तो आता वेगळा दिसत आहेत. मला नाही वाटत, कोणीतरी कॅरिबिअनमध्ये सुटीवर फिरायला येईल आणि भारतीय बातम्यांमधून वाचलेला हा तो मेहुल चोकसी आहे, असे त्याच्या लक्षात येईल, असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाली. मला कुणीही संपर्क साधलेला नाही. त्याच्या अपहरणाची कोणतीच माहिती नाही. आणि जसे की मी इतर मुलाखतींमध्येही म्हणाली, जे लोक जॉली हार्बर परिसर ओळखत असतील त्यांना माहित आहे की, येथून कुणाचे अपहरण करणे अशक्य आहे. ही सुरक्षित जागा आहे.
भारतीय बातम्या पाहत नाही -
मेहुल चौकसीशिवाय कोणी भारतीय जर तिच्या संपर्कात असेल तर, याला उत्तर देताना तिने सांगितले. पण माझ्या मते, मी अधिक निश्चित आहे की, क्युबा मेहुल चौकसीचे अंतिम ठिकाण असु शकते आणि कसेतरी त्याला कदाचित डोमिनिकामध्ये थांबायचे होते, असेही ती म्हणाली. मी युरोपिअन आहे. मी युरोपमध्ये राहते आणि मी भारतीय बातम्या पाहत नाही. मी फसव्यांचा पाठलाग करत नाही. त्यामुळे मला त्याचे खरे नाव आणि त्याची पार्श्वभूमी शेवटच्या आठवड्यापर्यंत माहित नव्हती. मी अंटिग्वातील सर्वाधिक लोकांमध्ये विश्वास ठेवते. कोणालाही त्याचे खरे नाव किंवा पार्श्वभूमी माहित असेल, असे मला वाटत नाही, असेही जराबिका म्हणाली.