ETV Bharat / international

अपह्रत मुलाला शोधण्यासाठी बापाचा दुचाकीवरून 5 लाख किलोमीटरचा प्रवास; अखेर 24 वर्षांनंतर सापडला मुलगा!

author img

By

Published : Jul 14, 2021, 5:03 PM IST

चीनच्या शॅनडोंग प्रांतात राहणाऱ्या गुओ गांगतांग यांचा दोन वर्षीय मुलगा गुओ शिन्झेनचे 1997 मध्ये अपहरण झाले होते. यानंतर गुओ गांगतांग यांनी एकट्याने दुचाकीवरून पाच लाख किलोमीटरचा प्रवास करत चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुलाचा शोध घेतला होता.मात्र तरिही त्यांना शिन्झेन सापडला नव्हता. अखेर चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात राबविलेल्या ऑपरेशन तौनयुआनमुळे तब्बल 26 वर्षांनंतर तांगयांग यांची शिन्झेनसोबत पुनर्भेट शक्य झाली आहे.

अपह्रत मुलाला शोधण्यासाठी बापाचा दुचाकीवरून 5 लाख किलोमीटरचा प्रवास; अखेर 24 वर्षांनंतर सापडला मुलगा!
अपह्रत मुलाला शोधण्यासाठी बापाचा दुचाकीवरून 5 लाख किलोमीटरचा प्रवास; अखेर 24 वर्षांनंतर सापडला मुलगा!

बीजिंग : 24 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाच्या शोधासाठी दुचाकीवरून तब्बल पाच लाख किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चीनमधील एका पित्याची अखेर त्याच्या मुलासोबत भेट झाली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर या पित्याला त्याचा मुलगा सापडला असून एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेशा असणाऱ्या या घटनेची आंतरराष्ट्रीय माध्यमांत मोठी चर्चा होताना दिसत आहे.

काय आहे घटना?

चीनच्या शॅनडोंग प्रांतात राहणाऱ्या गुओ गांगतांग यांचा दोन वर्षीय मुलगा गुओ शिन्झेनचे 1997 मध्ये त्यांच्या घरासमोरून अपहरण झाले होते. यानंतर पोलीस तपासातही शिन्झेनचा शोध न लागल्यामुळे गुओ गांगतांग यांनी एकट्याने दुचाकीवरून प्रवास करत चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुलाचा शोध घेतला होता. तब्बल पाच लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही त्यांना शिन्झेन सापडला नव्हता. अखेर चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात राबविलेल्या ऑपरेशन तौनयुआनमुळे तब्बल 26 वर्षांनंतर तांगयांग यांची शिन्झेनसोबत पुनर्भेट शक्य झाली आहे.

1997 मध्ये झाले होते अपहरण

गुओ शिन्झेन दोन वर्षांचा असताना सप्टेंबर 1997 मध्ये मानव तस्करांनी लियाओचेंगमधील राहत्या घरासमोरून त्याचे अपहरण केले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका पुरूष आणि महिला संशयिताला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. या दोघांनी गुओ शिन्झेनचे शॅनडोंगमधून अपहरण करून हेनान प्रांतात त्याची विक्री केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. शिन्झेनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले. यासाठी गुओ गांगतांगचे आणि त्याच्या पत्नीच्या रक्ताचे नमुनेही त्यांनी घेतले. मात्र त्यानंतरच्या तपासात त्याचा शोध लागू शकला नाही.

ऑपरेशन तौनयुआनमुळे झाली पुनर्भेट

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी देशभरात ऑपरेशन तौनयुआन अर्थात पुनर्भेट ही मोहिम राबविली. या मोहिमेत देशभरातून सुमारे 10 हजार लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांचे डिएनए जुळविण्यात आले. यातूनच हेनान प्रांतातल्या गुओ शिन्झेनचा डिएनए त्याच्या मूळ पालकांसोबत जुळला. या मोहिमेतूनच तब्बल 24 वर्षांनंतर गुओ गांगतांग यांची बेपत्ता मुलासोबत पुनर्भेट झाली आहे.

मुलाच्या शोधासाठी केला 5 लाख किलोमीटर प्रवास

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुओ गांगतांगने संपूर्ण चीनमध्ये दुचाकीवरून सुमारे पाच लाख किलोमीटरचा प्रवास केला होता. मुलाच्या शोधासाठी गुओ एकटेच दुचाकीवरून निघाले होते. सोबत मुलाची माहिती असलेले फलक त्यांनी दुचाकीला लावले होते. तिबेट आणि शिन्जियांग वगळता चीनमधील जवळपास सर्वच भागांत जाऊन त्यांनी मुलाचा शोध घेतला होता. त्यांच्या या शोध प्रवासावर आधारीत 'लॉस्ट अँड लव्ह' नावाचा एक सिनेमाही चीनमध्ये निघाला होता. हाँगकाँगचे अभिनेते अँडी लाऊ यांनी यात भूमिका साकारली होती.

सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने दिली माहिती

चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने मंगळवारी बीजिंगमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली तसेच या पुनर्भेटीची छायाचित्रेही जारी केली. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझा मुलगा मला पुन्हा मिळाला आहे. आता भविष्य हे पूर्णपणे आनंदी असेल असे गुओ गांगतांग माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुलाचा सांभाळ करणाऱ्या पालकांना आपले नातेवाईकच मानू असेही ते म्हणाले. तसेच जर मुलाला सांभाळ करणाऱ्या पालकांसोबत राहायचे असेल तर त्याच्या निर्णयाचा मी सन्मान करेल असेही ते म्हणाल्याचे चायना डेलीने म्हटले आहे.

बालकांचे अपहरण चीनमध्ये मोठी समस्या

बालकांच्या अपहरणाच्या घटना ही चीनमध्ये मोठी समस्या आहे. 2015 मधील एका अहवालानुसार चीनमध्ये दरवर्षी सुमारे 20 हजार बालकांचे मानव तस्करांकडून अपहरण होत असते. यापैकी अनेक बालकांची दत्तक घेण्यासाठी विक्री केली जाते. या समस्येने त्रस्त असलेल्या चीनने यासाठीच ऑपरेशन तौनयुआन राबविले.

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट; 9 चिनी नागरिकांसह 13 पाकिस्तानी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.