ETV Bharat / international

श्रीलंकेत होतेय राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक; भारताविषयी काय म्हणतायेत तिथले उमेदवार, जाणून घ्या

author img

By

Published : Nov 15, 2019, 3:18 PM IST

Updated : Nov 15, 2019, 7:06 PM IST

श्रीलंका हा भारताचा शेजारी देश आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तिथल्या सरकारचे सहकार्य आवश्यक असते. मागच्या काळात श्रीलंका चीनच्या अधिक जवळ जाताना दिसला. त्यामुळे श्रीलंकेशी जवळीक साधणे हे भारतापुढचे आव्हान आहे.

राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार - गोताबाया राजपक्षे आणि सजीत प्रेमदासा

नवी दिल्ली - श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक १६ नोव्हेंबरला (उद्या) होऊ घातली आहे. श्रीलंकेतील ही ८वी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात कोणताही विद्यमान पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेता निवडणूक लढवत नाही. शेजारी देश असल्याच्या कारणावरून येथील निवडणुकांना भारताच्या दृष्टीने महत्व आहे.

उद्या श्रीलंकेत राष्ट्राध्यपदाची निवडणूक होत आहे

या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी गोताबाया राजपक्षे आणि सजीत प्रेमदासा हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राजपक्षे हे श्रीलंका पोदुजन पेरमुना (एसएलपीपी) या पक्षाकडून तर प्रेमदासा युनायटेड नॅशनल पक्षाकडून (यूएनपी) निवडणूक लढवत आहेत. गोताबाया हे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे लहान बंधू आहेत. ही त्यांची जमेची बाजू. पण, लिट्टे या दहशतवादी संघटनेशी असलेला त्यांचा संबंध देशात चर्चीला गेला. या उलट प्रेमदासा यांची प्रतिमा स्वच्छ मानली जाते.

हेही वाचा - BRICS परिषद: दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलीयन डॉलरचं नुकसान - पंतप्रधान

निवडणुकीतले मुद्दे
एसएलपीपी आणि यूएनपी या दोन्ही पक्षांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. दोघांकडूनही देशाची ढासळती अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार, धार्मिक ध्रुवीकरण अशा मुद्यांचा आधार घेतला जात आहे. पण, त्यातही राजपक्षेंच्या एसएलपीपीची मदार बौद्ध सिंहली मतांवर आहे. तर प्रेमदासांचा यूएनपी दिवंगत राष्ट्राध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या नावावर मते मागत आहे.

काय आहेत मतांची गणिते
श्रीलंका हा बौद्ध सिंहली बहुल देश आहे. या समुहाची येथे बहुसंख्या आहे. याबरोबरच तामिळ १२ टक्के, मुस्लिम १० आणि ख्रिश्चन ७ टक्के आहेत. या अल्पसंख्यक समुहांची भूमिका निवडणुकीत महत्वाची समजली जाते. त्यामुळे अल्पसंख्यक कुणाला कौल देणार यावर सगळी भीस्त अवलंबून आहे. मुस्लिम मते प्रेमदासांच्या पारड्यात जातील. तर, ख्रिश्चनांना ईस्टर अॅटकचा नव्याने तपास करण्याचे आश्वासन देऊन राजपक्षेंनी वळवले आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा - पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा डीएनए, युनेस्कोच्या बैठकीत भारताने केली पाकिस्तानची पोलखोल

भारताच्या दृष्टीने श्रीलंकेची निवडणूक
श्रीलंका हा भारताचा शेजारी देश आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तिथल्या सरकारचे सहकार्य आवश्यक असते. मागच्या काळात श्रीलंका चीनच्या अधिक जवळ जाताना दिसला. त्यामुळे श्रीलंकेशी जवळीक साधणे हे भारतापुढचे आव्हान आहे.

राजपक्षे हे काँग्रेस सरकारसोबत अनुकूल होते. पण, मोदी सरकारविषयी त्यांचे मत तितकेसे अनुकूल नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील प्रशासन श्रीलंकेच्या हितसंबंधांना ओळखण्यात अपयशी ठरले असे राजपक्षेंचे मत आहे. त्यामुळे चीनसोबत सहकार्य करण्याचा त्यांचा इरादा आहे. आपले सरकार आले तर चीनशी संबंध अधिक दृढ करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावउलट प्रेमदासा यांचा कल भारताच्या विद्यमान सरकारशी जुळवून घेण्याकडे आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.