ETV Bharat / international

'जैश'चा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच, परराष्ट्रमंत्री कुरेशी यांची कबुली - jem

'मसूद पाकिस्तानातच आहे. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दिल्यास पाक सरकारकडून त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानच्या न्यायालयात टिकले आणि मान्य करण्यात आले, तर मसूदवर कारवाई होईल,' असे वक्तव्य कुरेशी यांनी केले आहे.

जैश-ए-मोहम्मद
author img

By

Published : Mar 1, 2019, 1:00 PM IST

लाहोर - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच असल्याची कबुली पाक परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे. 'मसूद पाकिस्तानातच असून तो खूप आजारी असल्याचे समजले आहे. माझ्या माहितीनुसार, तो आजारपणामुळे घरातूनही बाहेर पडत नाही. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दिल्यास त्याच्यावर कारवाई करू,' असे कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

'मसूद पाकिस्तानातच आहे. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दिल्यास पाक सरकारकडून त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानच्या न्यायालयात टिकले आणि मान्य करण्यात आले, तर मसूदवर कारवाई होईल. भारताने दिलेल्या पुराव्यांची शहानिशा केली जाईल. हे पुरावे 'खोडून काढता न येण्याइतके भक्कम' असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या न्यायालयाला तसे पटवून देऊ,' असे कुरेशी यांनी म्हटले आहे. दशतवादाला खतपाणी घालण्याचे आणि भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे कारस्थान करणारा पाकिस्तान वरकरणी दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास उत्सुक असल्याचे भासवत आहे.

पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना 'पाकिस्तानी पंतप्रधानांनी याही घटनेनंतर भारताला संतुलित आणि योग्य पर्याय सुचवला होता,' असे कुरेशी यांनी म्हटले असून पाकिस्तान साळसूदपणाचा आव आणत असल्याचे दिसत आहे.

undefined

'पाकिस्तानला युद्ध नको आहे. भारताने शांतीच्या दिशेने एक पाऊल टाकले, तर पाकिस्तान २ पावले टाकेल. आताचे पाकिस्तानचे सरकार आधीच्या सरकारांपेक्षा वेगळे आहे. ते अधिक जनताकेंद्रित आहे. आम्हाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यावर आणखी भर द्यायचा आहे. आम्हाला अफगाणिस्तानमध्येही शांतता हवी आहे. भारत आणि पाकिस्तान या आशियाई देशांमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने रस दाखविला आहे, ही सकारात्मक बाब आहे. अमेरिका आणि पाकिस्तान अनेक दशकांपासून चांगले मित्र आहेत. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील. तसेच, अफगाणिस्तानात १७ वर्षे सुरू असलेले युद्ध संपवण्यास पाकिस्तानही अमेरिकेला मदत करू शकेल,' असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानात मागील १७ वर्षांपासून अमेरिकन सैन्य दहशतवादाशी सामना करत आहे. तेथील तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानचाच अंतर्गत वरदहस्त असल्याचे पुरावे वारंवार मिळाले आहेत. आता पुलवामा हल्ल्यानंतर भारतासोबत चिघळलेले संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला गळ घलताना दिसत आहे. याबदल्यात अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारण्याची लालूच दाखवत आहे.

Intro:Body:

'जैश'चा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच, परराष्ट्रमंत्री कुरेशी यांची कबुली

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.