ETV Bharat / international

चक्क भूकंपादरम्यानही सुरक्षितपणे धावणारी रेल्वे - जपानची 'N700S सुप्रीम'! - भूकंपात चालणारी रेल्वे

ही ट्रेन ताशी ३६० किलोमीटर वेगाने धावू शकते. तसेच याचा ऑपरेटिंग वेग तासाला २८५ किलोमीटरपर्यंत मर्यादीत ठेवता येऊ शकतो. या ट्रेनची एकमेव द्वितीय वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षा प्रणाली. शिंकन्सेन नेटवर्कमध्ये भूकंपाच्या लहरी त्वरित ओळखण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. अशाप्रकारची यंत्रणा असलेली ही एकमेव ट्रेन आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीजेचा पुरवठा खंडीत झाल्यास सेल्फ-प्रोपल्शन सिस्टमद्वारे ही ट्रेन काही अंतर वीजेशिवाय चालवली जावू शकते..

Japan launches bullet train that can run during earthquake
चक्क भूकंपादरम्यानही सुरक्षितपणे धावणारी रेल्वे - जपानची 'N700S सुप्रीम'!
author img

By

Published : Jul 10, 2020, 5:35 PM IST

टोकियो - आपल्या नाविन्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानने नुकतीच एका विशेष बुलेट ट्रेनची निर्मिती केली आहे. या ट्रेनचे नाव 'N700S सुप्रीम' असे आहे. या ट्रेनचे वैशिष्ट्य हा तिचा वेग नसून, भूकंपाच्या वेळी प्रवाशांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याची क्षमता आहे! होय, भूकंप सुरू असतानाही ही ट्रेन सुरक्षितपणे वाहतूक करू शकते.

N700S (एस याचा अर्थ सुप्रीम) ही जपानी शिंकन्सेन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांच्या N700 मालिकेतील सर्वात अलिकडची नवीन ट्रेन आहे. त्यांनी आतापर्यंत N700 आणि N700A मॉडेलची यशस्वीपणे निर्मिती केली आहे.

जपान हे आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध राष्ट्र असल्याने, निप्पॉनने (Nippon) नियोजित वेळेमध्येच N700S ट्रेनची निर्मिती केली. या ट्रेनचे उद्घाटन टोकियो ऑलिम्पिक २०२०च्या वेळी होणार होते, परंतु कोविड-१९ महामारीमुळे उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

'N700S सुप्रीम'ची वैशिष्ट्ये..

ही ट्रेन ताशी ३६० किलोमीटर वेगाने धावू शकते. तसेच याचा ऑपरेटिंग वेग तासाला २८५ किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवता येऊ शकतो. या ट्रेनची एकमेव द्वितीय वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षा प्रणाली. शिंकन्सेन नेटवर्कमध्ये भूकंपाच्या लहरी त्वरित ओळखण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. विशेष ब्रेकिंग सिस्टमसह सुसज्ज असणारी ही नवीन ट्रेन अगदी वेगात असताना देखील सुरक्षितपणे आणि सहजपणे थांबवली जाऊ शकते. शिवाय या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीसारखी सेल्फ-प्रोपल्शन यंत्रणा बसवली आहे. अशाप्रकारची यंत्रणा असलेली ही एकमेव ट्रेन आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीजेचा पुरवठा खंडित झाल्यास सेल्फ-प्रोपल्शन सिस्टमद्वारे ही ट्रेन काही अंतर वीजेशिवाय चालवली जावू शकते. याव्यतिरिक्त, हे भूकंपादरम्यान उच्च जोखीमेच्या प्रदेशापासून बोगदा आणि उड्डाणपूलाच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढण्यासाठी ह्या ट्रेनची मदत घेतली जाऊ शकते.

या ट्रेनचे अंतर्गत भाग देखील उच्चप्रतीचे आहेत. प्रवाशांना आरामात बसता यावे, यासाठी विशेष आसन व्यवस्था तयार केली आहे. तसेच प्रत्येक सीटला स्वतंत्र पॉवर आउटलेट बसवले आहे. प्रवाशांना उतरताना त्यांचे सामान लक्षात यावे म्हणून प्रत्येक स्टॉपवर प्रवाशांच्या डोक्यावरील रॅक प्रकाशमान होते. त्याचबरोबर प्रत्येक प्रवास आरामदायक व्हावा, म्हणून या ट्रेनमध्ये नवीन सक्रिय सस्पेन्शन प्रणाली बसवली आहे. तसेच प्रत्येक गाडीच्या डब्यात जास्तीचे कॅमेरे बसवण्यात आली आहेत.

शिंकन्सेन (बोलीभाषेत "बुलेट ट्रेन" म्हणून ओळखली जाते) नेटवर्क-९ रेल लाईनने जोडण्यात आली आहे, जी जपानच्या भोवताली वेगवेगळ्या दिशेने प्रवासी घेऊन जाते. N700S सुप्रीम ही जपानच्या बुलेट ट्रेनपैकी सर्वात अलिकडची अद्ययावात आवृत्ती आहे, जी टोकियो आणि ओसाका या दोन शहरांना जोडते.

जपानने १९६४ साली टोकियोमध्ये उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. त्याचवेळी ऑलिम्पिकच्या कालावधीत टोकियो ते शिंकन्सेन लाइनची सुरुवात झाली होती. या पहिल्या शिंकन्सेन मार्गाने दोन शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ अत्यंत कमी केला, ज्यामुळे टोकियो आणि ओसाका दरम्यानचा प्रवास अधिक सोपा झाला. यामुळे जपानमधील व्यवसायात आणि जीवनाची शैलीत लक्षणीय बदल घडला.

दुसर्‍या महायुद्धानंतर जपानने आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यास सुरवात केली. वास्तविक, सध्या जपान हा जगातील सर्वात वेगवान रेल्वे मार्ग तयार करणारा देश ठरला आहे. आज जगातील अनेक देश शिंकन्सेन तंत्रज्ञानावर आधारित रेलगाड्या निर्माण करत आहेत. १८८९ मध्ये टोकियोहून ओसाकाला रेल्वेने जाण्यासाठी साडे सोळा तासांचा कालावधी लागायचा. १९६५पर्यंत पहिल्या शिंकन्सेन रेल्वेने प्रवासाची वेळ कमी करत तो केवळ ३ तास १० मिनिटांवर आणला.

हेही वाचा : कझाकिस्तानमध्ये कोरोनापेक्षाही घातक न्यूमोनियाचे ६०० बळी; चीनचा दावा..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.