टोकियो - जपानमध्ये हाजिबीस टायफून वादळाने थैमान घातले आहे. येथे मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे, अशी माहिती स्थानिक वृत्त संस्थेने दिली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी मृतांविषयी दुःख व्यक्त केले आहे.
-
Death toll from #TyphoonHagibis in Japan rises to 25: Japanese Media
— ANI (@ANI) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Death toll from #TyphoonHagibis in Japan rises to 25: Japanese Media
— ANI (@ANI) October 13, 2019Death toll from #TyphoonHagibis in Japan rises to 25: Japanese Media
— ANI (@ANI) October 13, 2019
'मी या वादळामुळे बळी गेलेल्यांविषयी शोक व्यक्त करत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांमध्ये सहभागी आहे,' असे म्हणत अॅबे यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याविषयीचे ट्विट केले आहे.
टायफून सोबतच लोकांना पूर आणि भूस्खलनाच्या संकटालाही सामोरे जावे आहे. अनेक नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. देशातील मध्य, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील प्रांतांमध्ये बचावकार्य सुरू आहे. जपानच्या मुख्य होंशू या बेटावरील ६ दशलक्ष लोकांना हा प्रदेश सोडण्यास सांगण्यात आले आहे.
जपानच्या हवामान खात्याने (Japanese Meterological Agency - जेएमए) शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या काही वेळ आधीच टायफून हाजिबीस वादळामुळे भूस्खलन होण्याची शक्यता वर्तविली होती. संस्थेने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि नियगाता हा प्रांतांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा दिला होता.
हाजिबीस टायफूनचे संकट 'आ' वासून उभे असतानाच आज सकाळी जपान ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले. भूकंपाचे केंद्र चिबा-केन प्रदेशात जमिनीखाली ८० किलोमीटरवर होते.