हनोई- कोरोनाच्या काळात सहकार्य वाढविण्यासाठी चीन, जपान आणि दक्षिण कोरियाने आज ऑनलाईन परिषद घेतली आहे. या संघटनेने परिषदेतून कोरोनाच्या काळात सामंजस्य वाढविण्यावर विचारमंथन करण्यात आले आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जेई-इन यांनी आसियान प्लसच्या सदस्य देशांना सार्वजनिक आरोग्यांमध्ये सहकार्य अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या लसीचा समान पुरवठा आणि उपाय यामध्ये विकास करण्यासाठी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. भविष्यात कोणताही संसर्गजन्य आजार आला तर त्यासाठी नेत्यांनी तयार राहावे, अशी त्यांनी विनंती केली.
जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा म्हणाले, की महामारी विरोधात एकत्रित काम करण्यासाठी सर्व नेते वचनबद्धता दाखवतील, अशी आशा आहे. चीनचे उपपंतप्रधान ली केकीयांग म्हणाले, की प्रदेशात पुन्हा विकासदर वाढेल, अशी आशा आहे.
जपान आणि दक्षिण कोरिकडून १ दशलक्ष डॉलरची मदत-
आसियान प्लसच्या नेत्यांनी वर्षाच्या सुरुवातील कोरोनाच्या काळात विशेष परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी विषाणुविरोधात एकत्रित व नियोनजबद्ध लढण्याचे निश्चित केले होते. कोरोना विषाणुमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. जपान आणि दक्षिण कोरियाने आसियान प्रादेशिक कोरोना निधीला प्रत्येक १ दशलक्ष डॉलर देण्याची वचनबद्धता दर्शविली आहे. या निधीचा वापर सदस्य देशांना वैद्यकीय उपकरणे खरेदी, कोरोनावरील औषध आणि लसीच्या संशोधनासाठी करता येणार आहे.