ETV Bharat / international

गुप्तचर यंत्रणा, रेंजर्सने पोलीस महासंचालकाचे अपहरण केले, पाक लष्कराची कबूली - पाकिस्तान आयएसआय

सफदर यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानात विरोधकांनी लष्कर आणि इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे लष्कराने या अटकेची चौकशी सुरू केली होती. त्यावर लष्कराच्या जनसंपर्क विभागाने आज अधिकृत वक्तव्य जारी केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 10, 2020, 7:17 PM IST

इस्लामाबाद - सिंध प्रांताच्या पोलीस महासंचालकाचे अपहरण गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आणि रेंजर्स या सुरक्षा दलाने केल्याचे पाकिस्ताने लष्कराने मान्य केले आहे. पाकिस्तानी मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे नेते मोहम्मद सफदर यांना मागील महिन्यात रात्री उशीरा खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. यावेळी एफआयआरवर सही करण्यासाठी पोलीस महासंचालकाचेच अपहरण करण्यात आले होते. मोहम्मद सफदर हे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचे जावई असून मरयम नवाज यांचे पती आहेत.

हेही वाचा - पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तानचा दर्जा पाकिस्तानने बदलला, स्थानिकांचे आंदोलन

सफदर यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानात विरोधकांनी लष्कर आणि इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे लष्कराने या अटकेची चौकशी सुरू केली होती. त्यावर लष्कराच्या जनसंपर्क विभागाने आज अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून गुप्तचर यंत्रणा आणि रेंजर्स दोषी आढळल्याचे म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय चौकशीत घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

सिंध प्रांतात सरकारविरोधी रॅलीच्या आयोजनासाठी मरयम नवाज आणि मोहम्मद सफदर सिंध प्रांतातील कराची शहरात आले होते. यावेळी त्यांनी मोहम्मद अली जीना यांच्या कबरेजवळ नागरिकांना संबोधित केले होते. तसेच इम्रान खान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. कबरेच्या संरक्षण भिंतीच्या आत जाऊन त्यांनी प्रदर्शन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - शरीफ हे लंडनमध्ये बसून सैन्यावर टीका करीत आहेत - इम्रान खान

त्या दिवशी रात्री सफदर यांना हॉटेलात जाऊन गुप्तपणे अटक करण्यात आली होती. पोलीस महासंचालाकांची अटकेस परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांचे अपहरण करण्यात आले होते. नक्की कोणी ही कारवाई केली. त्याची माहिती मिळत नसल्याने चौकशी समिती नेमण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.