जकार्ता - या महिन्याच्या सुरुवातील जावा समुद्रात विमान कोसळून अपघात झाला होता, या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता, श्रीविजय एअर नावाच्या विमानाचा अपघात झाला होता. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या आणखी तीन जणांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती इंडोनेशियन पोलिसांच्या आपत्ती पीडित आयडेंटिफिकेशन (डीव्हीआय) पथकाने शुक्रवारी दिली आहे.
मृतदेहामध्ये विमानाच्या पायलटचा समावेश
समुद्रात मिळालेल्या मृतदेहांमध्ये विमानाच्या पायलटचा समावेश आहे. पायलट कॅप्टन अफवान आरझेड यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. तर मध्य जावा प्रांताच्या स्रेगेन जिल्ह्याती रहिवासी असलेल्या अन्य दोघांचे देखील मृतदेह सापडले आहेत. सुयंतो आणि रियान्टो अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल रुस्दी हार्टोनो यांनी शुक्रवारी जकार्तामध्ये पत्रकारांना दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा पहिला रुग्ण अॅडमिट केलेल्या हॉस्पिटलला WHOची भेट