ETV Bharat / international

तालिबानी दहशतवाद्यांनी केले १५० भारतीयांचे अपहण, वाचा नेमकं काय घडलं

काबूल विमानतळावर जमलेल्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. तर तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे.

indians abducted by Taliban
धक्कादायक, तालिबान्यांकडून भारतीयांच अपहरण
author img

By

Published : Aug 21, 2021, 12:40 PM IST

Updated : Aug 21, 2021, 2:33 PM IST

काबूल - अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याने नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यातच काबूलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानतळावर जमलेल्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. जवळपास 150 भारतीय नागरिकांचे तालिबान्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.

तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे.

  • Ahmadullah Waseq, a Taliban spokesman has denied this report to a member of the Afghan media that reported on this story. More details are awaited. pic.twitter.com/hPq0i9evLK

    — ANI (@ANI) August 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय नागरिकांचे अपहरण केले नाही. तर त्यांना सुरक्षित स्थळी नेले आहे, असे स्पष्टीकरण तालिबानकडून जारी करण्यात आले आहे. 150 भारतीयांना सुरक्षित विमानतळात नेले, असे तालिबानकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही सरकारी संस्थांनी याबाबत भाष्य केले नाही अथवा दुजोराही दिला नाही. काबूल विमानतळाच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू होता. त्याच वेळेस तालिबानींचा एक गट आला आणि त्या सर्वांना घेऊन गेल्याची माहिती आहे. यातून सुटलेल्या लोकांनी आपण अपहरणातून बचावल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न -

अफगाणिस्तानच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या भारताच्या नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष अफगाणिस्तान 24 तास काम करीत आहेत. सुमारे सव्वाशे हिंदू-शीख कुटुंबांनी काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत.

हेही वाचा - अफगाणिस्तानमध्ये भयंकर परिस्थिती, पाहा फोटोच्या माध्यमातून

हेही वाचा - तालिबानींचा फाटला बुरखा: अनेक अल्पसंख्यांकांना केले ठार; अफगाणिस्तानमध्ये भयाचे सावट

हेही वाचा - 'तालिबानवर भारत विश्वास ठेवू शकत नाही, wait and watch ची भूमिका घ्यावी' - तज्ञ

Last Updated : Aug 21, 2021, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.