ETV Bharat / international

मतभेदातून वाद वाढायला नको, चर्चेने दोघांमधील प्रश्न सुटतील - सन वेईडोंग

दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांचा सन्मान करत मतभेद सोडवावे, यावर पंतप्रधान मोदींनीही सहमती दर्शवली आहे. यामुळे भारत- चीन मैत्रीमध्ये एका नव्या पर्वाला सरूवात होईल. मतभेद समजून न घेतल्याने द्विपक्षीय संबधातच अडचण यायला नको, असे वेईडोंग म्हणाले.

सन वेईडोंग
author img

By

Published : Oct 19, 2019, 1:03 PM IST

नवी दिल्ली - तामिळनाडूतील ममल्लापूरम येथे पंतप्रधान मोदी आणि शी झिनपिगं यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता कशी राहील याविषयी चर्चा झाली. मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे चीनचे भारतातील राजदूत सन वेईडोंग यांनी सांगितले

हेही वाचा - FATF चा पाकिस्तानला अंतिम इशारा, दहशतवाद संपवा अन्यथा...

दोन्ही देशांचे हितसंबंध सांभाळून महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. भारत आणि चीनने समजुतदारपणा दाखवत परस्पर सहकार्याने वादाचे मुद्दे सोडवायला हवे. दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांचा सन्मान करत मतभेद सोडवावे, यावर पंतप्रधान मोदींनीही सहमती दर्शवली आहे. यामुळे भारत- चीन मैत्रीमध्ये एका नव्या पर्वाला सरूवात होईल. मतभेद समजून न घेतल्याने द्विपक्षीय संबधातच अडचण यायला नको, असे वेईडोंग म्हणाले.

हेही वाचा - दहशतवादाला खतपाणी घालणारा पाक एफएटीफच्या करड्या यादीतच राहणार

काश्मीर मुद्यावरून चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा देत असतानाच पंतप्रधान मोदी आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग तमिळनाडूमध्ये भेटले. यावेळी कोणत्याही करारावर सह्या करण्यात आल्या नसल्या तरी औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय प्रश्नांसह व्यापार, उद्योग, द्विपक्षीय संबंध, दहशतवाद अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामुळे चीन भारतातील संबध सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.

२०१७ साली डोकलाम वादावरुन भारत चीनमधील संबध ताणले गेले होते. तर काश्मीरची स्वायतत्ता रद्द केल्याने पाकिस्तानची बाजू चीनने घेतली. तसेच काश्मीर बाबतच्या निर्णयाने अक्साई चीन भागात चीनचे सार्वभौमत्त्वही धोक्यात येत असल्याचे कांगवा चीनने केला होता. यापार्श्वभुमीवर चीनचे राजदूत चर्चेद्वारे संबध सोडवण्यावर भर देत आहेत. मात्र, चीनच्या भारत विरोधी कारवाया थांबल्यातरच दोन्ही देशांतील संबध सुधारु शकतात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.