नवी दिल्ली- युद्ध किंवा तणावाच्या परिस्थितीत आण्विक प्रकल्पांवर हल्ला करता येणार नाही, असा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली झाला आहे. त्यानुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आपापल्या देशातील आण्विक प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण केली.
-
MEA: India and Pakistan today exchanged, through diplomatic channels simultaneously at New Delhi and Islamabad, the list of nuclear installations and facilities covered under the Agreement on the Prohibition of Attack against Nuclear installations between India and Pakistan.
— ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MEA: India and Pakistan today exchanged, through diplomatic channels simultaneously at New Delhi and Islamabad, the list of nuclear installations and facilities covered under the Agreement on the Prohibition of Attack against Nuclear installations between India and Pakistan.
— ANI (@ANI) January 1, 2020MEA: India and Pakistan today exchanged, through diplomatic channels simultaneously at New Delhi and Islamabad, the list of nuclear installations and facilities covered under the Agreement on the Prohibition of Attack against Nuclear installations between India and Pakistan.
— ANI (@ANI) January 1, 2020
हेही वाचा - काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत
नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथील राजनैतिक अधिकाऱ्यांनी आज(बुधवारी) याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. जर आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला केला तर त्याचे परिणाम दूरगामी होतात, म्हणून भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली आण्विक प्रकल्पांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये हा करार झाला होता. हा करार १९९१ सालापासून अमलांत आला आहे. १९९२ सालापासून दोन्ही देशातील आण्विक प्रकल्पांबाबच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.
हेही वाचा - सरसेनाध्यक्ष पदाच्या निर्मितीचे सावध स्वागत हवे..