नवी दिल्ली - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी म्हणजे आज सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा ( India and China holding the 15th round talk ) होत आहे. भारतीय हद्दीतील चुशुल मोल्डो मीटिंग पॉइंटमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 15 वी फेरी आहे. सकाळी 10 वाजता बैठक सुरू झाली. दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या पहिल्या 14 फेऱ्या झाल्या असून त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण, तोडगा अद्याप निघालेला नाही.
-
India and China holding the 15th round of Corps Commander level talks at the Indian side of Chushul Moldo Meeting Point today. The meeting started at 10 AM: Sources
— ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India and China holding the 15th round of Corps Commander level talks at the Indian side of Chushul Moldo Meeting Point today. The meeting started at 10 AM: Sources
— ANI (@ANI) March 11, 2022India and China holding the 15th round of Corps Commander level talks at the Indian side of Chushul Moldo Meeting Point today. The meeting started at 10 AM: Sources
— ANI (@ANI) March 11, 2022
आत्तापर्यंतच्या चर्चेत दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सो लेक, गलवान व्हॅली आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सच्या उत्तर आणि दक्षिणी किनार्यावर सहमती दर्शवली आहे. उरलेल्या समस्या सोडवण्याबाबत आता दोन्ही बाजूने चर्चा होत आहे. यापूर्वी झालेली 14 व्या फेरीची चर्चा अनिर्णित राहिली हे विशेष.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजू आता सीमावर्ती भाग सोडवण्यावर भर देणार आहेत. या बैठकीत दोन्ही बाजू परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे, दोन्ही देशांची अलीकडील विधानेही या सकारात्मक समाधानावर केंद्रित होती.
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमेवर शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांनी पाऊल पुढे टाकवे. तसेच सीमा नियमांचे पालन करावे आणि सीमाभागातील शांती भंग होणार नाही, याची काळजी एकत्रितपणे घ्यावी, यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.
हेही वाचा - Exclusive : भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रणरेषेबाबत स्पष्टता हवी : अशोक कंठा