इस्लामाबाद - माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविषयी कुठलाही आकस नाही. त्यांची प्रकृती जास्त महत्वाची आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. दरम्यान, शरीफ यांना काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असे विधान नवाज यांचे बंधून शाहबाज शरीफ यांनी केले होते. त्या पार्श्वभूमिवर इम्रान यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
इम्रान खान म्हणाले, की शासन नवाज शरीफ यांना मानवतेच्या पातळीवर सहकार्य करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करील. त्यांचे नाव देशांतर बंदीच्या यादीतून (एक्झीट कंट्रोल ऑफ लिस्ट) वगळण्यासंबंधी सर्व कायदेशीर शक्यता पडताळण्यात येतील. शरीफ कुटुंब न्यायालयात गेले, तसेच देशातंर बंदी यादीतून वगळण्यासाठी नुकसानभरपाई करार लिहून दिला तर हरकत नाही. असेही खान म्हणाले.
हेही वाचा - पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा डीएनए, युनेस्कोच्या बैठकीत भारताने केली पाकिस्तानची पोलखोल
नवाज शरीफ यांना एक वेळ चार आठवड्यांसाठी विदेशात जाण्याची मुभा देण्यात यावी. पण, त्यासाठी त्यांनी ७ बिलीयनचा करारनामा लिहून द्यावा असा निर्णय पाकिस्तानच्या मंत्रमंडळाने बुधवारी घेतला आहे. दरम्यान, या निर्णयाला पाकिस्तान मुस्लिम लिगने लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शरीफ यांचे नाव देशांतर बंदी यादीतून वगळण्यासंबंधीची याचिका त्याच दिवशी उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
हेही वाचा - BRICS परिषद: दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलीयन डॉलरचं नुकसान - पंतप्रधान
इम्रान खान यांनी शरीफ कुटुंबावर राजकारण करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, की शरीफ कुटुंबाने नुकसानभरपाई करारनाम्याचा जास्त बाऊ न करता नवाज शरीफांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. दरम्यान, शरीफ रविवारी विदेशात जाणार होते. पण, देशांतर बंदी यादीतून नाव वगळण्याच्या मुद्यावरुन त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले.