बिजिंग - चीनमध्ये कोरोना संशयित व्यक्तींना देखरेखीखाली ठेवलेल्या हॉटेलची इमारत कोसळली. या इमारतीमध्ये कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० जणांना ठेवण्यात आले होते. अनेक जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्ती निवारण पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे.
हेही वाचा - लडाख आणि तामिळनाडूत कोरोनाचे तीन रुग्ण, देशभरात ३४ जणांना लागण
दुर्घटना घडलेली इमारत ५ मजली असून इमारतीत ८० खोल्या होत्या. मलब्याखाली अडकलेल्या २३ नागरिकांना आत्तापर्यंत वाचवण्यात आले आहे. फुजीयान प्रांतातील क्वांन्झावू शहरात ही घटना घडली. ७० जण मलब्याखाली अडकले होते, बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. सायंकाळी ७.३० वाजता ही घटना घडली असून बचावकार्य सुरू आहे.
हेही वाचा - देशभरात कोरोनाचे आतापर्यंत ३४ रुग्ण, पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
जानेवारी महिन्यापासून चीनधील वुहान प्रांतामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. चीनमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिकांना संसर्ग झाला आहे. शहरे ओस पडली असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाचा परिणाम संपूर्ण चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून जास्त प्रसार झालेल्या शहरांतील सर्व व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. चीनमधून आता कोरोना तब्बल ९० देशांत पसरला आहे.