ETV Bharat / international

पाकिस्तानात दिवाळी उत्साहात साजरी; रोषणाई आणि फुलांनी सजवले मंदिर - पाकिस्तान लेटेस्ट न्यूज

पाकिस्तानातील कराचीमध्ये हिंदू समुदायाने कोरोना नियमावलींचे पालन करत दिवाळी साजरी केली. स्वामी नारायण मंदिर विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आले.

पाकिस्तान
पाकिस्तान
author img

By

Published : Nov 15, 2020, 12:23 PM IST

कराची - दिव्यांचा सण असलेली दीपावली पाकिस्तानातील कराचीमध्ये उत्साहात साजरी झाली. कराची शहरात हिंदू समुदायाने कोरोना नियमावलींचे पालन करत दिवाळी साजरी केली. कराची येथील स्वामी नारायण मंदिरात हिंदू बांधवांकडून दिवे लावण्यात आले असून विद्युत रोषणाई आणि फुलांनी हे मंदिर सजवण्यात आले आहे.

पाकिस्तानात दिवाळी साजरी

दिवाळी सण आतषबाजीने साजरा झाला. लहान मुले, युवक, वृद्ध अशा सर्वच जणांनी उत्सावात साजरी झाली, असे पाकिस्तानातील एक हिंदू व्यक्तीने सांगितले. तसेच आम्ही येथे दिवाळी साजरी आणि कलेचा आनंद घेण्यास आलो आहोत. रक्ताने खेळण्याऐवजी नानाविध रंगांबरोबर आपला सण साजरा करणे कधीही चांगलेच, असे मला वाटते, असे एका पाकिस्तानीतील हिंदू महिलेने सांगितले.

या देशात दिवाळी साजरी -

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानमधील हिंदू नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 'सर्व हिंदू नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा,' असे त्यांनी उर्दूत टि्वट केले. जगात हिंदू लोकसंख्या असलेल्या सर्वच देशात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. यात इंडोनेशिया, तैवान, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका, कॅनडा, सिंगापूर, इंग्लंड यांचा समावेश आहे. हिंदू लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या देशात पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - पाक लष्कराच्या गोळीबारात आसामधील जवानाला वीरमरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.