ETV Bharat / international

पाकिस्तानात एका हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या

author img

By

Published : Mar 20, 2021, 4:56 PM IST

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजय लालवाणी असे पत्रकाराचे नाव आहे. लालवाणी यांच्या हत्येला पाकिस्तानमधील पत्रकारांच्या गटाने विरोध दर्शविला. इतकेच नव्हे तर पत्रकारांच्या गटानेही हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला.

पाकिस्तान
पाकिस्तान

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजय लालवाणी असे पत्रकाराचे नाव आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अजय लालवाणी हे स्थानिक टेलिव्हिजन चॅनल आणि उर्दू भाषेतील वृत्तपत्र 'डेली पुचानो' मधील पत्रकार होते.

लालवाणी हे सुकुर शहरातील एका दुकानात बसले होते. तेव्हा मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. लालवाणी यांचे कोणाशीही वैर नव्हते, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांनी दावा केला, की वैयक्तिगत वादातून हा हल्ला झाला. पोलिसांनी शुक्रवारी तिघांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.

लालवाणी यांच्या हत्येला पाकिस्तानमधील पत्रकारांच्या गटाने विरोध दर्शविला. इतकेच नव्हे तर पत्रकारांच्या गटानेही हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला. पत्रकाराच्या हत्येच्या निषेधार्थ स्थानिक व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

पाकिस्तानात पत्रकारांची हत्या -

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिला पत्रकाराला गोळ्या घालून जीवे मारण्यात आले होते. शाहीना ही पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. 1992 पासून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.