ढाका/आयझॉल - मिझोराममधील ( Earthquake In Mizoram ) लोकांना पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून याची तिव्रता ही तीव्रता रिश्टर स्केलवर (Earthquake Intensity) 6.1 इतकी होती. तसेच बांगलादेशातील चिट्टागोंगपासून ( Chittagong ) 175 किमी पूर्वेला भारत-म्यानमार सीमेवर शुक्रवारी सकाळी भूकंपाचे ( Earthquake ) जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही.
जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते.
भूंकप झाल्यास काय करावे -
- इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
- भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
- मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
- घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
- उंचावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा