नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज(गुरुवार) शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठकीला हजेरी लावली. रशियाची राजधानी मास्को शहरात ही बैठक पार पडली. भारत-चीन संबंध ताणले असताना या निमित्ताने दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आमनेसामने आले आहेत. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे वेई फेंग यांनीही मास्कोत बैठक घेतली होती. मात्र, त्यातून सीमावादावर काहीही तोडगा निघाला नाही.
-
At the formal opening of the meeting in Moscow of the Foreign Ministers of the Shanghai Cooperation Organization. pic.twitter.com/QjtYnUxJlw
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">At the formal opening of the meeting in Moscow of the Foreign Ministers of the Shanghai Cooperation Organization. pic.twitter.com/QjtYnUxJlw
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 10, 2020At the formal opening of the meeting in Moscow of the Foreign Ministers of the Shanghai Cooperation Organization. pic.twitter.com/QjtYnUxJlw
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 10, 2020
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि रशियाचे सेर्गी लार्वो या बैठकीस उपस्थित होते. एससीओ संघटनेचे आठ सदस्य देश आहेत. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तझाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य आहेत. भारत आणि पाकिस्तान २०१७ साली या संघटनेचे सदस्य झाले.
सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरचे छायाचित्र एस. जयशंकर यानी ट्विटरवर पोस्ट केले आहे. या संघटनेद्वारे सदस्य देशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मंच उपलब्ध झाला आहे. चीन आणि भारत दोघांतील वादाचे मुद्दे सोडविण्यासाठी एससीओच्या मंचाला वापर करतील, अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे.
एस. जयशंकर चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. मागील ४ महिन्यापासून पूर्व लडाखमध्ये भारत चीनमध्ये सीमावाद सुरू असून स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू असून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. चीनने आक्रमक धोरण स्वीकारत भारतीय हद्दीत प्रवेश केला असून मागे हटण्यास नकार दिला आहे. त्यानंतर भारतानेही काही महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. नुकतेच चिनी सैन्याने सीमेवर गोळीबारही केला. त्यामुळे सीमेवरील शांतता भंग झाली असून वातावरण तापलेले आहे.