ETV Bharat / international

बांग्लादेशात अल्पसंख्य सुरक्षितच, परराष्ट्र मंत्री मोमेन यांनी भारताचा दावा फेटाळला - बांग्लादेशात सांप्रदायिक सलोखा

भारतात आधीच अनेक समस्या आहेत, असे मोमेन यांनी म्हटले आहे. 'त्यांचे त्यांना आपापसांत भांडू द्या. त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, आमच्यातील मैत्रीसंबंधांना धक्का बसेल असे काही घडणार नाही, अशी मित्रदेश म्हणून आमची भारताकडून अपेक्षा आहे,' असा थेट इशारा मोमेन यांनी दिला आहे.

बांग्लादेश परराष्ट्र मंत्री मोमेन
बांग्लादेश परराष्ट्र मंत्री मोमेन
author img

By

Published : Dec 12, 2019, 10:32 AM IST

ढाका - भारताच्या लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व कायदा सुधारणा विधयेक (CAB) पारित झाले. या विधयकानुसार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानात छळ होत असलेल्या आणि तेथून निर्वासित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजांना भारताचे नागरिकत्व देता येणार आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बांग्लादेशात धार्मिक सलोखा असल्याचे म्हटले आहे.

'असे अत्यंत कमी देश आहेत जेथे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा पहायला मिळतो. त्यात बांग्लादेशचाही समावेश होते. अमित शाह काही महिने बांग्लादेशात राहिले, तर त्यांना देशात अत्यंत चांगल्या प्रकारे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा असलेला पहायला मिळेल,' असे अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.

याशिवाय, भारतात आधीच अनेक समस्या आहेत, असे मोमेन यांनी म्हटले आहे. 'त्यांचे त्यांना आपापसांत भांडू द्या. त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, आमच्यातील मैत्रीसंबंधांना धक्का बसेल असे काही घडणार नाही, अशी मित्रदेश म्हणून आमची भारताकडून अपेक्षा आहे,' असा थेट इशारा मोमेन यांनी दिला आहे.

  • Minister of Foreign Affairs of Bangladesh says,"They (India) have many problems within their country. Let them fight among themselves. That does not bother us. As a friendly country, we hope that India will not do something that affects our friendly relationship":Bangladesh media https://t.co/a0QiZ1V0gk

    — ANI (@ANI) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हे प्रकरण आमच्या नजरेस आले आहे. आम्ही त्याचा बारकाईने अभ्यास करू. त्यानंतर याच्याविषयी भारताशी चर्चा करू,' असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, अब्दुल मोमेन तीन दिवसीय दौऱ्यासाठी गुरुवारी भारतात येणार आहेत. भारत-बांग्लादेशामधील द्विपक्षीय संबंध आणि परराष्ट्र व्यवहार यासंबंधी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते भारतात येतील.

Intro:Body:

dhaka emphasises on communal harmony foreign affairs minister momen on cab about condition of minorities

dhaka emphasises on communal harmony, bangladesh foreign affairs minister a k abdul momen on cab, bangladesh fm momen about condition of minorities, बांग्लादेशात सांप्रदायिक सलोखा, परराष्ट्र मंत्री मोमेन यांची CAB वर प्रतिक्रिया

-----------------------

बांग्लादेशात सांप्रदायिक सलोखा, परराष्ट्र मंत्री मोमेन यांची CAB वर प्रतिक्रिया

ढाका : भारताच्या लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व कायदा सुधारणा विधयेक (CAB) पारित झाले. या विधयकानुसार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानात छळ होत असलेल्या आणि तेथून निर्वासित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजांना भारताचे नागरिकत्व देता येणार आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बांग्लादेशात धार्मिक सलोखा असल्याचे म्हटले आहे.

'असे अत्यंत कमी देश आहेत जेथे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा पहायला मिळतो. त्यात बांग्लादेशचाही समावेश होते. अमित शाह काही महिने बांग्लादेशात राहिले, तर त्यांना देशात अत्यंत चांगल्या प्रकारे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा असलेला पहायला मिळेल,' असे अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.

याशिवाय, भारतात आधीच अनेक समस्या आहेत, असे मोमेन यांनी म्हटले आहे. 'त्यांचे त्यांना आपापसांत भांडू द्या. त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, आमच्यातील मैत्रीसंबंधांना धक्का बसेल असे काही घडणार नाही, अशी मित्रदेश म्हणून आमची भारताकडून अपेक्षा आहे,' असे इशारावजा वक्तव्य मोमेन यांनी केले आहे.

'हे प्रकरण आमच्या नजरेस आले आहे. आम्ही त्याचा बारकाईने अभ्यास करू.  त्यानंतर याच्याविषयी भारताशी चर्चा करू,' असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, अब्दुल मोमेन तीन दिवसीय दौऱ्यासाठी गुरुवारी भारतात येणार आहेत. भारत-बांग्लादेशामधील द्विपक्षीय संबंध आणि परराष्ट्र व्यवहार यासंबंधी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते भारतात येतील.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.