ETV Bharat / international

फिलिपाईन्समध्ये गोनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढून 16 वर

'सुपर टायफून' (जबरदस्त चक्रीवादळ) गोनीने जेव्हा पहिल्यांदा हल्ला केला, तेव्हा वाऱ्याचा वेग 225 किलोमीटर प्रतितास होता. मात्र, देशातून बाहेर पडल्यानंतर याचा वेग कमी झाला. गोनीमुळे बिस्कोल भागात पूर आणि मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

फिलिपाईन्स गोनी चक्रीवादळ न्यूज
फिलिपाईन्स गोनी चक्रीवादळ न्यूज
author img

By

Published : Nov 3, 2020, 6:26 PM IST

मनिला - फिलिपाईन्समध्ये या वर्षात आतापर्यंत आलेल्या सर्वात शक्तिशाली वादळ गोनीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 16 झाली आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, देशातील मुख्य बेट असलेल्या लुझोनमध्ये दक्षिणेकडे असलेल्या भागात बिस्कोल येथील नागरिक सुरक्षा कार्यालयाने (ओसीडी) येथील 3 जण बेपत्ता असल्याचेही सांगितले आहे.

'सुपर टायफून' (जबरदस्त चक्रीवादळ) गोनीने जेव्हा पहिल्यांदा हल्ला केला, तेव्हा वाऱ्याचा वेग 225 किलोमीटर प्रतितास होता. मात्र, देशातून बाहेर पडल्यानंतर याचा वेग कमी झाला. गोनीमुळे बिस्कोल भागात पूर आणि मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

हेही वाचा - फिलिपाईन्समध्ये 'टायफून मोलावे'च्या बळींची संख्या 22 वर

नागरिक सुरक्षा कार्यालयातील प्रशासक रिकादरे जेलद यांनी माध्यमांना सांगितले की, 12 ठिकाणांवरील 20 लाखांहून अधिक लोक गोनीमुळे प्रभावित झाले आहेत. मागील आठवड्यात आलेल्या चक्रीवादळ मोलावेमुळे 22 लोक मारले गेले होते. सोबतच याच्यामुळे पायाभूत सुविधा आणि शेती नष्ट झाली होती.

दरम्यान, राज्याच्या हवामान ब्युरोने सांगितले की, ते उष्णकटिबंधीय हवेतील कमी दाबाची स्थिती 'अत्सानी'वर देखील लक्ष ठेऊन आहेत. ही स्थिती वायव्येकडील मध्य कुजोनच्या बाजूचे वाढत आहे.

फिलिपाईन्समध्ये दरवर्षी सुमारे 20 टायफून आणि उष्ण कटिबंधीय वादळे येतात. 110 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहात वारंवार भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेकही होतात. 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' आणि 'पॅसिफिक टायफून पट्ट्या'त स्थान असल्यामुळे हा देश जगातील सर्वाधिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक आहे.

हेही वाचा - व्हिएतनाममधील मोलावे वादळामध्ये 27 ठार, 50 बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.