ETV Bharat / international

डॅनियल पर्ल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद शेखची फाशी रद्द - अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल हत्या

पाकिस्तानमधील सिंध उच्च न्यायालयाने 2002 मधील अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल हत्या प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. अहमद ओमर सईद शेखच्या फाशीच्या शिक्षेचे 7 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेत रुपांतर केले आहे.

Daniel Pearl murder
Daniel Pearl murder
author img

By

Published : Apr 3, 2020, 10:58 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील सिंध उच्च न्यायालयाने 2002 मधील अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल हत्या प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. अहमद ओमर सईद शेखच्या फाशीच्या शिक्षेचे 7 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेत रुपांतर केले आहे. तर अन्य 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायाधीश मोहम्मद करीम खान आगा यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्व पुराव्यांची तपासणी 18 वर्षांपूर्वी दोषींकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकावर निर्णय दिला आहे. अहमद ओमर सईद शेख हे गेल्या 18 वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर हत्या प्रकरणातील इतर 3 आरोपी फहाद नसीम, ​​सलमान साकीब आणि शेख आदिल यांची जन्मठेपेची शिक्षा संपवून निर्दोष सोडले आहे.

डॅनियल पर्ल हे अमेरिकेच्या 'द वॉल स्टिट जर्नल' या वर्तमानपत्राचे दक्षिण आशियाचे प्रमुख होते. एका संशोदनासंदर्भात ते पाकिस्तानतला गेले होते. त्यानंतर 2002 मध्ये डॅनियल पर्ल याचे अपहरण करून त्याचा शिरच्छेद केला होता. त्यांचा मृतदेह कराचीतील कब्रस्थानात सापडला होता. त्याच्या शिरच्छेदाचे चित्रीकरण असलेल्या व्हिडियो टेपही मृतदेहानजिक आढळली होती. डॅनियल यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पाकिस्तानवर दबाव आणला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.