वुहान - चीनमध्ये आयात केलेल्या गोठवलेल्या अन्नाच्या तीन पॅकेटमध्ये कोविड - 19 चा विषाणू सापडल्याचे चीनच्या वुहानमधील प्रशासकीयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वात प्रथम चीनच्या वुहान या शहरातूनच कोरोना विषाणूचा उद्रेक झाला होता. यानंतर याचा जगभरात प्रसार झाला.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने शनिवारी पालिका आरोग्य आयोगाच्या निवेदनाचा हवाला देत या घटनेविषयी माहिती दिली आहे. फ्रीज गोदामांत ब्राझीलमधून आयात केलेल्या गोठवलेल्या गोमांसाचे दोन नमुने तपासले असता यात कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळून आले. तसेच, दुसऱ्या एका गोदामात व्हिएतनाममधून आयात केलेल्या गोठविलेल्या मच्छीच्या एका नमुन्यातही हा विषाणू सापडल्याची बाब समोर आली आहे.
हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज
स्थानिक अधिकाऱ्यांनी या सर्व उत्पादनांवर सील करून ते अलगीकरणात ठेवले आहेत. या पदार्थांच्या संपर्कात असलेल्या कर्मचार्यांवर न्यूक्लिक अॅसिडच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत, सर्व या सर्वांच्या चाचण्या निगेटव्ह आल्या आहेत.
ज्या गोठवलेल्या पदार्थांच्या नमुन्यांमध्ये विषाणू असल्याचे आढळले आहे, त्यांना सध्या बाजारात प्रवेश करण्यास मनाई आहे. आयातीत खाद्यपदार्थांद्वारे कोविड-19 चा प्रसार थांबवण्याच्या चीनच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
हेही वाचा - ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी