नवी दिल्ली - काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. गुटनिरपेक्ष देशांची (NAM) मंत्रिस्तरीय बैठक शुक्रवारी पार पडली. त्यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पाकिस्तानच्या काश्मीरच्या भूमिकेवर टीका केली. बैठकीत 'प्रादेशिक अखंडता' या मुद्यावर पाकिस्तानला कठोर संदेश दिला.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी एनएएम मंत्र्यांच्या बैठकीत असे निवेदन केले की, “अजेंडा नसलेले आणि व्यापक सभासदत्व नसलेले मुद्दे उपस्थित करण्यापूर्वी वैयक्तिक सदस्यांनी थांबून विचार केला पाहिजे. एनएएम कधीच दुसर्या राज्याद्वारे एखाद्या प्रदेशाची प्रादेशिक अखंडता बिघडविण्याच्या उद्देशाने करण्याचा प्रयत्न कधीच होऊ शकत नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आपल्या देशाविषयी बोलताना अंजेड्यावर नसताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे मुरलीधरन यांनी त्यांना सुनावले.
संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना होऊन यावर्षी 75 वर्षे होत आहेत. या वर्षी ऐतिहासिक बांडुंग सम्मेलनाचा (बर्मा, श्रीलंका, भारत, इंडोनेशिया व पाकिस्तान) 65 वा वर्धापन दिन पण आहे. हे दोन्ही दिवस एकत्र साजरे करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे, असेही मुरलीधरन म्हणाले.