बीजिंग : भारत आणि चीनच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांनी मागे हटण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती चीनी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पँगॉग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणी भागावर तैनात असलेले सैन्यदल आजपासून (बुधवार) मागे घेण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीनी माध्यमांनी दिली माहिती..
याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु कियान यांनी सैन्य मागे घेतले जात असल्याबाबत माहिती दिली. त्यांच्या या वक्तव्याबाबत चीनीच्या अधिकृत माध्यमांनी वृत्त दिले आहे.
लष्करी स्तरावरील चर्चेनंतर निर्णय..
कियान यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते, की चीन आणि भारतामध्ये लष्करी कमांडर स्तरावरील झालेल्या चर्चेनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या चर्चेमध्ये १० फेब्रुवारीपासून सैन्यदल मागे घेण्यास सुरुवात करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्यानुसार आजपासून सैन्य मागे घेण्यास सुरुवात होणार होती.
गेल्या वर्षी लडाखमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही सैन्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा : माझ्या भाषणांमध्ये अडचण निर्माण करणं, हे एक सुनियोजित षडयंत्र - नरेंद्र मोदी